डिजिटल सातबारा साठी आता उमंग मोबाईल ॲप
डिजिटल सातबारा साठी आता उमंग मोबाईल ॲप
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाने संगणकीकृत केलेला व महाभूमी पोर्टल द्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आता केंद्र शासनाच्या उमंग (Umang) या मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध होवू लागला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील ४४,५६० महसुली गावातील २ कोटी ५७ लक्ष सातबारा संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी ९९% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ प्रत्येकी १५ रुपयेच्या डिजिटल पेमेंट भरून कोठूनही व केंवाही उपलब्ध होत आहे त्यासाठी महसूल विभागाने महाभूमी हे पोर्टल ( https://mahabhumi.gov.in/mahabhumilink) विकसित केले असून या पोर्टल वरून डिजिटल ७/१२ उपलब्ध होत होते आता हीच सुविभा केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल ॲपवरून उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून ANDROID मोबाईल ॲप व ॲप्स स्टोअर वरून ॲपल मोबाईल साठी उपलब्ध करून दिले आहे. सध्या राज्यातील दीड ते दोन लाख नागरिक या डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार , खाते उतारे व मिळकत पत्रिकांचा त्यांच्या कार्यालयीन व न्यायालयीन कामकाजासाठी वापर करत आहेत. आज पर्यत महाभूमी पोर्टल वरून कोटी डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख डाउनलोड करून वापरले असून त्यातून 102 कोटी रुपयांचा महसूल देखील शासनाला मिळाला आहे. महाभूमी पोर्टल वर आज रोजी 22 लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची प्रिंट मिळविण्यासाठी महा- ई सेवा केंद्र किंवा झेरोक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता परिणामी १५ रुपयांच्या ७/१२ साठी २५/३० किंवा काही ठिकाणी ५० रुपये मोजावे लागत होते. तसेच महाभूमी पोर्टल हे संकेतस्थळ लक्षात ठेवावे लागत होते आता फक्त उमंग मोबाईल ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवले का झाले काम.त्यामुळे आपल्या मोबाईलवरच डिजिटल स्वरूपात ७/१२ उपलब्ध होईल व हा ७/१२ प्रिंट न काढताच अन्य व्यक्ती ला अथवा कार्यालयाना पाठविता येईल. परिणामी कागदाचा अनावश्यक वापर कमी होईल याच ॲपवरून आपले खात्यावर पैसे भारता येतील व याच ॲपवरून ७/१२ वरील डॉकूमेंट आय डी वरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल.
अ.नं. डिजिटल अभिलेख प्रति अभिलेख नक्कल फी (रुपये) पासून उपलब्ध एकूण डाउनलोड एकूण नक्कल फी जमा
१. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ १५ सप्टे २०१९ पासून ४.१० कोटी ६१.५२ कोटी रुपये
२. डिजिटल स्वाक्षरीत ८अ १५ ऑगस्ट २०२० पासून १.२१ कोटी १८.२७ कोटी रुपये
३. डिजिटल स्वाक्षरीत फेरफार १५ ऑगस्ट २०२१ पासून १२.५० लक्ष १.८८ कोटी रुपये
४. डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका अ) ग्रामीण - ४५ रु. जानेवारी २०२१ पासून
ब) नगर पालिका क्षेत्र -९० रु.
क) महानगर पालिका क्षेत्र १३५ रु.
५. ७/१२ पडताळणी निशुल्क ------ सप्टे २०१९ पासून --- निशुल्क
"आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उमंग मोबाईल ॲपपवरून देखील उपलब्ध होणार असल्याने त्याची उपलब्धता अत्यंत सोपी व सहज होईल परिणामी डिजिटल ७/१२ व महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती आहे हेच दिसून येते "
-रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी, पुणे
Very Useful
ReplyDelete