रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पीएमआरडीएच्या आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची मान्यता

पीएमआरडीएच्या  आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची मान्यता 

                                पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमांना प्राधिकरणाच्या कार्यकारी समिती ने दि 30 जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्राधिकरण सभे समोर ठेवण्यास मान्यता दिली आहे. श्री मनोज सौनिक  अपर मुख्य सचिव वित्त तथा अध्यक्ष कार्यकारी समिती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर मान्यता देण्यात आली.  या बैठकीला नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी  महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला , सह आयुक्त बन्सी गवळी व स्नेहल बर्गे , मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर , मुख्य लेखा व वित्त अधिकारा श्रीमती सविता नलावडे प्रत्यक्ष तसेच दोन्ही महानगरपालिका आयुक्त दोन्ही पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण हे व्हिडिओ कॅान्फरन्स द्वारे उपस्थित होते . या बैठकीत प्राधिकरणाच्या आकृतीबंध मान्यतेचा एक टप्पा पूर्ण झाला.  मार्च महिन्यात होणार्‍या प्राधिकरण सभेत आकृतीबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला शासन मान्यता मिळाले नंतर प्राधिकरणाला स्वताचे कर्मचारी अधिकारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
                                              आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदा चे उप महासंचालक श्री प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने केले या समिती मध्या सेवा निवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी श्री  प्रमोद रेंगे व सेवा निवृत्त उप जिल्हाधिकारी श्री मुकेश काकडे यांनी सदस्य म्हणून व अभिषेक देशमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सचिव म्हणून काम केले असून त्यांना बंसी गवळी सह आयुक्त व राहुल महिवाल महानगर आयुक्त यांचे मार्गदर्शन लाभले. उप अभियंता,  शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक  अशी विविध पदे थेट पद्धतीने mpsc मार्फत भरली जाणार आहेत. एकूण 407 पदांच्या आकृतीबंधामध्ये  157 पदे सरळ सेवेने भरली जाणार असून  तर उर्वरित पदोन्नतीने  व प्रतिनियुक्तीने भरली जातील. तत्कालीन पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या असून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसाना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत pcntda चे 40 कर्मचारी कार्यरत असून 50 अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

Comments

Archive

Contact Form

Send