रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मंडळ अधिकारी यांनी विशिष्ट कालावधीत निर्गत केलेल्या फेरफार ची माहिती

 

विषय – मंडळ अधिकारी यांनी विशिष्ट कालावधीत निर्गत केलेल्या फेरफार ची माहिती

                     अनेक मंडळ अधिकारी यांनी केलेल्या मागणी वरून ई फेरफार प्रणालीमध्ये आज पासून प्रमाणित केलेल्यां फेरफारांची यादी उपलब्ध करून दिली आहे. मंडळ अधिकारी यांचे लोगीनला महत्वाचे अहवाल मध्ये अतिरिक्त अहवाल मध्ये प्रमाणित झालेल्या फेरफार क्रमांकाची यादी हा अहवाल दिला आहे त्यात दिनांक ------ पासून दिनांक ----- पर्यंत

१. मंजूर झालेले फेरफार

२. नामंजूर फेरफार आणि

३. प्रमाणीकरण करण्यासाठी उपलब्ध फेरफार

                 असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.  ह्याचा वापर करून मंडळ अधिकारी यांना कोणत्याहीकालावधीत मंजूर / नामंजूर फेरफार ची यादी पाहता येईल .

 

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक

ई फेरफार, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे

दिनांक २५.१२.२०२०

Comments

  1. सदरचे ऑपशन आजुन दिसुन येत नाही आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send