अनेक वर्षानंतर सातबारा नमूना झाला सुधारित - महसूल विभागाने निर्गमित केला शासन निर्णय
नमस्कार सर ,
काल मा. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांचे अध्यक्षतेखाली तसेच अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितिन करीर सर आणि जमाबंदी आयुक्त मा. चोक्कलिंगम सर यांचे उपस्थितीत मंत्रालयात ई-फेरफार प्रकल्पल्पाची आढावा बैठक झाली. त्यात अनेक महत्वाचे निर्णय झाले . महसूल विभागाने 50 वर्षापूर्वी ( सन 1971 ) विहित केलेला गाव नमूना 7/12 सुधारित करण्याचा व तो सुधारित 7/12 ई फेरफार प्रणालीत लागू करण्यास जमाबंदी आयुक्त यांना अनुमती दिली . हा नवीन नमूना अधिक माहितीपूर्ण असून तो सामान्य माणसाला समजायला देखील सोपा झाला आहे . या बाबतची सर्व सुधारणा ई फेरफार प्रणालीत करण्यात आली असून तो लवकरच लागू करण्यात येईल त्यानंनातर हा सुधारित गाव नमूना 7/12 डिजिटल स्वाक्षरीने सामान्य माणसाला कोठूनही आणि केंव्हाही डवूनलोड करून घेता येईल .चार वर्षाच्या कष्टाळा फळे येवू लागली दररोज हजारो खातेदार डिजिटल्स स्वाक्षरीत 7/12 वापरत आहेत हे पाहून समाधान वाटते .
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प , पुणे
दिनांक 3.9.2020
सर याचा एक नमुना पाहायला मिळेल का कसा असेल नवीन 7/12 उतारा!
ReplyDelete