रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दिनांक २४/०२/२०२० पासून ई फेरफार आज्ञावली मध्ये दिलेल्या सुविधा व सुधारणा




दिनांक  २४/०२/२०२० पासून ई फेरफार आज्ञावली मध्ये दिलेल्या सुविधा व सुधारणा  

ई फेरफार मधील नविन विकसित मुद्दे-
1.       सरकार व सरकारी पट्टेदार भूधारणा असलेले सर्वे कलम १५५ मधील सर्व प्रकारचे फेरफार घेण्या करिता उपलब्ध करून  देण्यात आले आहेत.
2.       सरकार भूधारणा असलेल्या गटावर तहसीलदार यांचे फेरफार घेण्याची परवानगी घेतल्या नंतर आदेशाने जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्से तयार करणे फेरफार घेण्यास उपलब्ध करून दिले आहेत.
3.        कलम १५५ मध्ये नविन फेरफार प्रकार - भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनींचे नियंत्रित सत्ता प्रकार (१-क) साठीचे वर्गीकरण करणे
4.       अनोंदणीकृत बक्षीसपत्र अविभाज्य हिस्सा संपूर्ण विक्री - नवीन सुधारणा -
5.       अनोंदणीकृत बक्षीसपत्र अविभाज्य हिस्सा अंशतः विक्री  - नवीन सुधारणा -
6.       नोंदणीकृत हक्कसोड  (खाते नुसार व सर्वे नुसार) - नवीन सुधारणा -
7.       हक्कसोड फेरफार अनोंदणीकृत रि-एन्ट्री  (नोटीस काढणे आधी)  - नवीन सुधारणा –
8.       हक्कसोड नोंदणीकृत रि-एन्ट्री (नोटीस काढणे आधी)  - नवीन सुधारणा -
9.       फेरफार ने होणारे खाता विभाजन या पर्याया मध्ये ७/१२ वरील खात्यामधील चालू नावे व कंस झालेली नावे यांचे विभाजन (खात्यावरील चालू नावांच्या ७/१२ वरील  वेगवेगळ्या ग्रुप प्रमाणे खाते व कंस झालेल्या सर्वे नावांचे एक खाते या प्रमाणे)
10.    SECUGEN FDU-5 हे अद्ययावत DEVICE SOFTWARE मध्ये समावेश करण्यात आले आहे.

ई फेरफार मधील सुधारणा
11.    SKN-TKN मधील सुधारणा (घेणार चे खाता क्रमांक निरंक असल्यास योग्य मेसेज दिला आहे)
फेरफार मंजूर करताना घेणार खातेदार खाते क्रमांक TKN असल्यास फेरफार प्रमाणीकरण शेरा भरताना TKN दुरुस्त करणे ची सुविधा दिली आहे.
12.    वारस फेरफार ने खात्यामध्ये एका पेक्षा अधिक नावे असतील तर खाते प्रकार संयुक्त ऐवजी सामाईक होईल
13.    एकाच गटावरील एका खात्यावर ‘मयताचे नाव कमी करणे’ फेरफार प्रलंबित असतांना त्याच ७/१२ वरील दुसऱ्या खात्यावर वारस फेरफार घेता येईल.
14.    कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकारातील प्रकार, उपप्रकार बदलणे या फेरफार ची काम संपल्याची घोषणा झाले नंतर पुन्हा त्याच सर्वे वर दुरुस्ती करता येणार नाही.
15.    ‘अदलाबदली’ फेरफार चे नाव आता ‘खातेदारांची अदलाबदली’ व ‘सर्वे अदलाबदली’ चे नाव ‘आदेशाने सर्वे क्रमांक अदला बदल करणे’ असे बदलण्यात आले आहे.
16.    ‘सर्वे क्रमांक अदलाबदली करणे’ या फेरफारासाठी नोटीस कालावधी रद्द करणेत आला असलेने फेरफार मंजूर करणेस कालमर्यादा नाही. (या अगोदर १५ दिवसाचा कालावधी होता)
17.    ODC मधील अहवाल क्रमांक २५ मध्ये सुधारणा केली असून भोगवटादार वर्ग १ व त्याचा उपप्रकार न निवडलेले तरी देखील गाव नमुना १ क मध्ये असलेले सर्वे दाखविले आहेत व या अहवाल मधील सर्वे दुय्यम निबंधक यांचे कडे दस्त नोंदणी करणेस व अनोंदणीकृत हक्कसोड फेरफार घेण्यास प्रतिबंध हटविण्यात आला आहे.
18.    खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती हे स्वतंत्र DASHBOARD वरील फेरफार देखील DSD होतील.
19.    दुय्यम निबंधक यांचे कडून व्यक्तीगत खात्या करिता चुकीचे ARTICLE(अविभाज्य हिस्सा खरेदी)  निवडलेने त्याची री-एन्ट्री खरेदी या टेम्प्लेट मध्ये रुपांतरीत करून दिली आहे.
20.    अपूर्ण माहिती असलेने एखादा दस्त नष्ट करण्यात आल्या नंतर त्या दस्ताला दिलेल्या फेरफार ची री-एन्ट्री करताना दस्ताची माहिती (दस्त क्रमांक व दुय्यम निबंधक) ही कायम ठेवण्यात आलेली आहे
21.    नोंदणीकृत फेरफार ची री-एन्ट्री करताना दस्ताची माहिती (दस्त क्रमांक व दुय्यम निबंधक) ही कायम ठेवण्यात आलेली आहे त्यात बदल करता येणार नाहीत.
22.    मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजुरीची कार्यवाही करणेस निवडल्या नंतर पूर्वावलोकन शेरा नामंजूर भरल्यास सदर फेरफार  अनोंदणीकृत फेरफार री-एन्ट्री मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे असा मेसेज देण्यात आला आहे.
23.    डॅशबोर्ड अद्ययावत करणे - मधील अडचण (फेरफार नामंजूर केल्या नंतर फेरफार प्रमाणिकरण शेरा टिक केल्यावर सर्वे डॅशबोर्ड वरून काढून टाकणे करिता)
24.    राजपत्राने नावात बदल, आदेशाने नावात दुरुस्ती हे फेरफार आता सर्व खाते प्रकार करिता घेता येतील
25.    वारस फेरफार घेताना खाता क्रमांक ने शोधा मधील दुरुस्ती (गावामध्ये उपलब्ध नसलेला खाता क्रमांक ने शोधा केलेस व त्या नंतर योग्य खाता क्रमांक भरून शोध केलेस कोणतीही कार्यवाही होत नव्हती ती अडचण सोडविण्यात आली आहे.)
26.    अविभाज्य हिस्सा पूर्णतः खरेदी (खात्यातील एखादा व्यक्ती त्याचा हिस्सा अंशतः विक्री करत असल्यास त्याच्या नावास कंस होणे ही अडचण आता येणार नाही)
27.    सामान्य फेरफार मधील क्षेत्र दुरुस्ती फेरफार मध्ये निवडलेल्या ७/१२ च्या एकका प्रमाणेच ७/१२ च्या मूळ क्षेत्रात दुरुस्ती करता येईल उदा. एकक आर.चौ.मी असल्यास केवळ बिनशेती क्षेत्र व बिनशेती आकारणी यात दुरुस्ती होईल.
28.    अहवाल १ मधील २० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे शेती ७/१२ व ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्राचे बिनशेती ७/१२ तहसीलदार याच्या परवानगी दिल्या नंतर दुय्यम निबंधक याना दस्त नोंदणी करणेस उपलब्ध होतील.
29.    नोंदणीकृत फेरफार नामंजूर केले नंतर नामंजूर केलेल्या फेरफार मधील दस्त क्रमांक पुन्हा वापरता येत नव्हता तोच दस्त क्रमांक आता नविन फेरफार नोंद घेण्यास उपलब्ध असतील.
30.    आदेशाने फेरफार क्रमांक दुरुस्ती फेरफार मंजूर करून देखील नविन फेरफार घेताना त्या सर्वे वर  फेरफार क्रमांक दुरुस्ती फेरफार प्रलंबित मेसेज येणे ही अडचण सोडविण्यात आलेली आहे.
31.    तहसीलदार यांच्या लॉगीन USER CREATION लॉगीन मधील कलम १५५ मधील सर्व फेरफार प्रकार मधील मान्यता देताना दिसणाऱ्या PAGING च्या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत.
32.    सरकार सर्वे आदेश दस्तावेज फेरफार करिता मान्यता देताना आदेशाची प्रत UPLOAD करणेस येणारी अडचण सोडविण्यात आली आहे.
33.    ७/१२ च्या मूळ क्षेत्रा पेक्षा पिक पाहणी चे क्षेत्र अधिक असले बाबत चा मेसेज चूक दुरुस्ती व खाता दुरुस्ती ७/१२ पाहताना दिला आहे.
34.    दुय्यम निबंधक याना ७/१२ दाखविताना तलाठी नाव व ७/१२ वरील १५ रुपये शुल्क स्वीकारले बाबत चा मेसेज दाखविला जाणार नाही.
35.    सामान्य फेरफार मधील हक्कसोड फेरफार घेताना दस्ताची माहिती भरणे अनिवार्य केले आहे.
36.    ज्या फेरफार चे नोटीस बजावून १८ दिवस पूर्ण झालेले आहेत तरी देखील हरकत बाबत शेरा भरलेला नाही असे फेरफार देखील FIFO मध्ये घेण्यात आलेले आहेत.
37.    ज्या फेरफार चे नोटीस बजावून १५ दिवस पूर्ण झालेले आहेत परंतु हरकत बाबत शेरा भरलेला नाही असे फेरफार प्रमाणिकरण FIFO स्किप करण्यास उपलब्ध असतील
DSD आज्ञावली
1)       पिक पाहणी मध्ये बदल केलेले सर्वे पिक पाहणी पश्चात DSD डॅशबोर्ड मध्ये साईन करणेस उपलब्ध असतील
2)       सर्वे DSD करताना ७/१२ च्या मूळ क्षेत्रा पेक्षा पिक पाहणी चे क्षेत्र अधिक असले बाबत चा मेसेज दिला असून असे ७/१२ DSD होणार नाहीत
3)       पिक पाहणी पश्चात DSD करताना ७/१२ च्या मूळ क्षेत्रा पेक्षा पिक पाहणी चे क्षेत्र अधिक असले बाबत चा मेसेज दिला असून असे ७/१२ DSD होणार नाहीत.

DDM – अभिलेख वितरण प्रणाली
1)       DDM- चलन प्रिंट अहवाल वर्ष २०२० ची अडचण सोडविली. 
2)       DDM मधील अक्षरी ७/१२ शोधा योग्य प्रकारे होईल. 
3)       DDM आज्ञावली द्वारे वितरीत होणाऱ्या ७/१२ वर ७/१२ च्या मूळ क्षेत्रा पेक्षा पिक पाहणी चे क्षेत्र अधिक असले बाबत चा मेसेज प्रिंट वर दाखविला आहे.    
4)       ७/१२ वरील तीन वर्षाची पिक पाहणी ची माहती LIVE डाटाबेस मधून दाखविली अगोदर तयार केलेल्या HTML वरून दाखविली जात होती.                                                                                
ODC
1.                   अहवाल ४३ अ (सरकार अथवा सरकारी विभागाचे खाते यामध्ये एकपेक्षा जास्त नावे असलेल्या खात्यांची यादी) ODC मध्ये एकूण विसंगती मध्ये दाखविला आहे.
2.                   अहवाल ४३ ब (सरकार अथवा सरकारी विभागाचे खाते ज्या ७/१२ वर आहे त्या ७/१२ वर इतर खाते असलेल्या सर्व्हे क्रमांकांची यादी) ODC मध्ये एकूण विसंगती मध्ये दाखविला आहे.
3.                   अहवाल ४५ चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे फेरफार क्रमांक असलेले सर्वे क्रमांक दाखविण्यात आलेले आहेत याची दुरुस्ती सुविधा ई –फेरफार मध्ये देण्यात येणार आहे.
4.                   अहवाल ४६ पिकांचे क्षेत्र हे गाव नमुना सात वरील क्षेत्रापेक्षा जास्त असलेल्या सर्वे चा अहवाल दाखविला आहे.
USERCREATION

1.                   मंडळ अधिकारी यांनी FIFO स्किप करणे करिता पाठविलेल्या विनंत्या मान्य/अमान्य करणेस तहसीलदार यांचे लॉगीन ला देखील FIFO असेल
2.                   कलम १५५ अंतर्गत विनंत्या मान्यता व फेरफार घेण्याची परवानगी देणे करिता तहसीलदार यांना  BIOMETRIC पडताळणी आवश्यक असेल.
3.                   नियंत्रित सत्ताप्रकार असलेल्या सर्व्हे  क्रमांकावर फेरफार घेण्यासाठी परवानगी देणे करिता तहसीलदार यांना  BIOMETRIC पडताळणी आवश्यक असेल.
4.                   मंडळ अधिकारी यांची फेरफार FIFO मधून वगळण्यासाठीची विनंती मान्य अथवा अमान्य करणे करिता तहसीलदार/नायब तहसीलदार इ-फेरफार  यांना  BIOMETRIC पडताळणी आवश्यक असेल.
5.                    भुधारणा सरकार असलेल्या सर्व्हे क्रमांकावर फेरफार घेण्यासाठी आदेश देणे करिता तहसीलदार यांना  BIOMETRIC पडताळणी आवश्यक असेल.
6.                   भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनींचे नियंत्रित सत्ता प्रकार (१-क) साठीचे वर्गीकरण करणे मान्यता देण्यास तहसीलदार यांना BIOMETRIC पडताळणी आवश्यक असेल.
7.                   चुक दुरुस्ती व खाता दुरुस्ती मध्ये एखादा सर्वे नामंजूर करता येईल जे अगोदर शक्य नव्हते.
8.                   मोठ्या क्षेत्राचे बिनशेती ७/१२ (९९ आर चौ.मी पेक्षा अधिक) तसेच अहवाल १ मधील मोठ्या क्षेत्राचे ७/१२ वर फेरफार घेण्या साठीची परवानगी मध्ये दुरुस्ती केली.
9.                   सरकार भूधारणा असलेल्या ७/१२ वर देखील तहसीलदार यांच्या मान्यते नंतर आदेशाने ७/१२ बंद करून नविन पोटहिस्से तयार करणे फेरफार घेता येईल.
सदरच्या सर्व सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी ही विनंती 




रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प .

Comments

  1. If you're trying to lose pounds then you absolutely have to start following this totally brand new custom keto meal plan diet.

    To produce this keto diet, certified nutritionists, fitness trainers, and chefs have united to develop keto meal plans that are effective, painless, economically-efficient, and fun.

    From their grand opening in early 2019, 1000's of clients have already transformed their body and health with the benefits a great keto meal plan diet can provide.

    Speaking of benefits: clicking this link, you'll discover 8 scientifically-certified ones offered by the keto meal plan diet.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send