चुकीने नोंदविलेल्या भोगवटदार वर्ग-१ चा उपप्रकार अथवा इतर आधिकारातील तपशील निरंक करणे
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.आ.का.-४ /रा.स./ मा.सू. क्र. 125 /२०२० दिनांक : 15/02/२०२०
प्रति,
डिस्ट्रीक
डोमेन एक्सपर्ट (डि.डि.ई) तथा
उप
जिल्हाधिकारी (सर्व)
विषय :- चुकीने
नोंदविलेल्या भोगवटदार वर्ग-१ चा उपप्रकार अथवा इतर आधिकारातील तपशील निरंक करणे
या पूर्वी गाव नमूना नं. ७/१२ वरील भुधारणा पद्दती भोगवटादार वर्ग १ व २
च्या उपप्रकाराची माहिती इतर अधिकारामध्ये दिसत नव्हती तथापी दि. 17.03.2012 च्या शासन
निर्णयान्वये सदारची माहिती इतर अधिकारात दर्शविली जात आहे . ई फेरफार आज्ञावलीतील
काही त्रुटी मुळे किंवा नजर चुकीने भुधारणा पद्दती वर्ग १ असल्यास त्याचा उपप्रकार
“आदिवाशी
खातेदार ची वर्ग १ ची जमीन” व “मुंबई कुळवहिवाट
व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३अ -१ च्या तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी”
असा निवडला असल्यास आणि ७/१२ वर असा शेरा लागु नसल्यास किंवा अनावश्यक असल्यास तो निरंक करण्याची सुविधा ई-फेरफार
आज्ञावलीमध्ये कलम १५५ अंतर्गत दिलेली आहे .
ही सुविधा खालील दिलेल्या सुचनांप्रमाणे
वापरावी :-
१.
ई-फेरफार कलम १५५ च्या मेनु मधुन “चुकीने
नोंदविलेल्या भोगवटदार वर्ग-१ चा उपप्रकार अथवा इतर आधिकारातील तपशील निरंक करणे”
पर्याय निवडावा त्यामध्ये गावातील भोगवटदार वर्ग-१ असलेले व त्याचे उपप्रकार
निवडलेले सर्व ७/१२ दिसतील.
२.
ज्या ७/१२ वरील जमिनी वर्ग 1 च्या असून
त्यावर कोणतीही बंधने / नियंत्रण नसल्यास असा आणी निवडलेला उपप्रकार पुर्णपणे निरंक करावयाचा
असल्यास किंवा काढून टाकवयाचा असल्यास असे ७/१२ निवडा (टिक) करावेत व “भोगवटदार वर्ग-१ चा उपप्रकार व इतर
अधिकारातील तपशिल निरंक करणे” या पर्यायाला टीक करावे. असे केल्याने आपण निवडलेला
७/१२ चा उपप्रकार निरंक होईल.
३.
ज्या ७/१२ वरील निवडलेला उपप्रकार
योग्यच आहे परंतु तो भुधारणा पद्दती वर्ग १ निवडा करताना उपप्रकार निवडलेला आहे
शिवाय इतर अधिकारात फेरफार घेऊनही तसा शेरा ठेवला आहे म्हणजेच वर्ग १ चा उपप्रकार
दुबार दर्शविण्यात येत आला असल्यास अशा
वेळी पर्याय “भोगवटदार वर्ग-१ चा उपप्रकार कायम
ठेऊन फक्त इतर अधिकारातील तपशिल निरंक करणे” हा पर्याय निवडावा.
वरील प्रमाणे दिलेल्या दोन्ही पर्यायचा गरजेप्रमाणे
काळजीपूर्वक वापर करावा.
या सुविधा वापरण्यासाठी चे user manual सोबत जोडले आहे.
आपला
विश्वासू,
( रामदास जगताप )
राज्य
समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रति:
1. उपायुक्त (महसूल), विभागीय आयुक्त
कार्यालय (सर्व)
2. उप विभागीय अधिकारी (सर्व)
3. तहसिलदार (सर्व) .
Strange "water hack" burns 2 lbs in your sleep
ReplyDeleteMore than 160 000 women and men are trying a simple and SECRET "water hack" to drop 2lbs each and every night while they sleep.
It is very simple and it works every time.
Just follow these easy step:
1) Grab a glass and fill it half full
2) Proceed to use this strange hack
and be 2lbs skinnier the next day!