रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दहा दिवसात सोळा हजार पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ पेमेंट गेटवे वरून झाले डाऊनलोड

 विषय -दहा  दिवसात  सोळा  हजार पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ पेमेंट गेटवे वरून  झाले  डाऊनलोड


                                         शासनाच्या निर्देशाप्रमाणे महसूल विभागाने सुमारे १  कोटी ७५ लाख डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ राज्यातील जनतेला पेमेंट गेटवे च्या माध्यमातून रुपये १५ भरून ऑनलाईन उपलब्ध करून दिले असून त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या १०  दिवसात राज्यात सुमारे १ लाख ९५ हजार नागरिकांनी ह्याचा शोध घेतला असून त्यापैकी सुमारे १०००० नागरिकांनी ऑनलाईन पैसे भरून सोळा  हजार पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ प्रत्यक्ष डाऊनलोड  देखील केले आहेत . त्यासाठी सामान्य जनतेतून महसूल विभागाचे अभिनंदन होत आहे त्यासाठी महसूल कुटुंबाचा एक भाग असलेले सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे विशेष अभिनंदन .

अजूनही आपल्याला काही अडचणी येत असल्यास / माहिती नसल्यास
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR या लिंक चा वापर करा

ही लिंक मोबाईलवर देखील अगदी व्यवस्थित चालते .
आपले अभिप्राय अजून चागली सेवा देण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील .
धन्यवाद .

आपला
रामदास जगताप
दि २.१०.२०१९ 

Comments

  1. Respected सर, 7/12 डाऊनलोड करण्यापूर्वी प्रिंट Preview असावा तसेच Payment करण्यापूर्वी Confirmation विचारण्यात यावे. सदर अभिप्राय वर विचार-विमर्श होईल हिच अपेक्षा. धन्यवाद.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send