रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महाभूलेख वरील ७/१२ ओटीपी (OTP) टाकल्या नंतरच दिसणार

नमस्कार मित्रांनो ,


         समान्य जनतेला फक्त पाहण्यासाठी / माहितीसाठी   दिसणारा विनास्वाक्षरीत  ७/१२  व खाते उतारा ( ८ अ ) महाभूलेख या संकेतस्थळावर आता ओटीपी  (OTP) टाकल्यानंतरच दिसणार .

                           महाराष्ट्र राज्यात गेले अनेक दिवसापासून सुरु असलेले ७/१२ संगणकीकरण जनतेला जेथे पाहायला मिळते ते विनास्वाक्षरीत ७/१२ व ८ अ पाहण्याचे ठिकाण म्हणून प्रशिद्द असलेले ठिकाण म्हणजेच महाभूलेख संकेतस्थळ (https://mahabhulekh.maharashtra.gov.in/) . या संकेतस्थळावर माहिती साठी सद्यस्थितीतील अद्ययावत ७/१२ व ८ अ जनतेला विना स्वाक्षरीत का होईना  उपलब्ध होत आहे . या संकेतस्थळावरील विनास्वक्षारीत ७/१२ जनतेला फक्त माहितीसाठी असलेने विनाशुल्क / मोफत उपलब्ध आहेत .ह्याची उलाब्धता वाढत असलेने अनेक शेतकरी / खातेदार / व्यापारी / व्यावसाईक/ वकील / बॅंका /सोसायट्या या संकेस्थळावरून ७/१२  ८ अ  काढतात . काही महिन्यापूर्वी डाऊनलोड होणाऱ्या  ८० हजार ७/१२ व २५ हजार ८अ  ची संख्या सध्या २लाख ४० हजार ७/१२ व ४० हजार ८ अ असी झाल्याने अनेकवेळा सकाळी १० ते सायंकाळी ६.०० या कार्यालयीन वेळेत वापरकर्त्यांची संख्या खूपच वाढल्याने अनेक वापरकर्त्यांना सेवा मिळत नसल्याचे दिसून आलेने जमाबंदी आयुक्त कार्यालयाने महाभूलेख संकेतस्थळावरील ७/१२ व ८ अ आता  मोबाईलवर वर येणारा  ओटीपी (OTP) टाकल्यानंतरच डाऊनलोड करता येईल अशी सुधारणा आज पासून लागू करणेत आली आहे व आत्ता एका मोबाईल नंबरवर दिवसभरात तीन ७/१२ व तीन ८ अ उपलब्ध होणार आहेत या मुळे प्रत्येक वापरकर्त्याला कामेई वेळात ७/१२ व ८ अ उपलब्ध हातील अशी अपेक्षा आहे .


                         कोणत्याही शासकीय / कायदेशीर कामासाठी लागणारा ७/१२ व खाते उतारा तलाठी कांचे कडून रक्कम रुपये १५ फक्त भरून स्वाक्षरीत करून घेणे आवश्यक आहे अथवा आपला सातबारा या संकेथालावर देखील  डिजिटल स्वाक्षरीत  ७/१२ पत्येक ७/१२ ला १५ रुपये   भरून घेता येतील . सध्या ५१ लक्ष ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत स्वरुपात http://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/Satbara या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत . (  सध्या हे मोफत असून लवकरच त्याला फी द्यावी लागेत ). या सोबतच आपल्या गावाचे चावडीचा डिजिटल नोटीस बोर्ड http://mahabhumi.gov.in/aaplichawdi या संकेतस्थळावर पाहता येते . या सर्व सेवांचा लाभ राज्यातील जनेते घ्यावा हीच अपेक्षा .

आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.रा.) पुणे
दि २.३.२०१९
   
          

Comments

Archive

Contact Form

Send