BSNL CLOUD वरील जिल्ह्यांना ई मेल व मोबाईल नंबर नोंदविणे दि २६.३.२०१९ पासून बंधनकारक
नमस्कार मित्रांनो ,
ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासन धोरणाप्रमाणे प्रणालीचे पुर्ण कामकाज माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उच्चाधिकार समितीने निश्चित करुन दिलेल्या ESDS Software Solution Pvt. Ltd. या कंपनीचे GCC Cloud डाटा सेंटर मध्ये स्थानांतरीत करणेत येत आहे. त्यासाठी क्लाऊडवर स्थानांतरीत करण्यापूर्वी आपल्या जिल्हयातील तलाठी, मंडळ अधिकारी यांचेसह सर्व वापरकर्ते यांचे अचूक ई-मेलआयडी व अचूक मोबाईल नंबर युझर क्रियेशन मधुन प्रणालीमध्ये नोंदविणे बाबत कळविण्यात आलेले आहे.
परंतु अद्यापावेतो अनेक वापरकर्त्यांच्या ई-मेल आय डी ची नोंद झाल्याचे दिसून येत नाही, तरी प्रत्येक डीबीए यांचे UC लॉगिन मधून “मंडळनिहाय वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका स्तरीय अहवाल” या अहवाल मधून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ई-मेल आय डी ची नोंद केल्याची पडताळणी करावी.
अनेक वापरकर्त्यांचे email आय डी व मोबाइल नंबर अद्यावत केलेले नाहीत त्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना ई फेरफार प्रणालीमध्ये कामकाज करता येणार नाही .
ज्या तलाठी मंडळ अधिकारी यांचे ई मेल आय डी व मोबाइल नंबर अद्यावत केलेले नाहीत त्यांनी ते ई फेरफार प्रणालीत अद्यावत करावेत व त्या नंतरच या लाठी व मंडळ अधिकारी यांना काम करता येईल . अशे अद्यावत केलेले ई मेल आय डी व मोबाईल नंबर डी बी ए यांनी uc मधून मंजूर / कायम करावेत . तसेच “मंडळनिहाय वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका स्तरीय अहवाल ” या अहवाल मधून सर्व वापरकर्ते यांचे ई मेल आय डी व मोबाईल नंबर अद्यावत केले आहेत ह्याची खात्री करावी
सदरची अट bsnl cloud वरील जिल्ह्यांना दि २६.३.२०१९ पासून लागू केली आहे व ईतर जिल्ह्यांना दि १.४.२०१९ पासून लागू करणेत येणार आहे ह्याची नोंद घ्यावी , ही विनंती.
सोलापूर , ठाणे , नाशिक चंद्रपूर व गोंदिया यांना मंगळवार पासून नियम लागू
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी व डी बी ए यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
आपला
रामदास जगताप
दि २५.३.२०१९
After getting cloud fecllities for thise sys ,
ReplyDeleteIs the speed of server is faster than old sys pls try to give clerification sir?