ई पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे रब्बी व उन्हाळी हंगामाची पीक पाहणी नोंदी घेण्याबाबत.
दिनांक:- 0१/0३/2019.
प्रति,
मा. जिल्हाधिकारी - पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद , अमरावती व नागपूर
संदर्भ:- दि. १० /०९ /२०१८ चा शासन निर्णय . व या कार्यालयाची मार्गदर्शक सूचना क्र. ९७
महोदय
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी घेण्याचा पथदर्शी प्रकल्प
राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील खालील प्रमाणे एका तालुक्याची निवड संदर्भीय
शासन निर्णयान्वये केली आहे त्या
प्रमाणे ई पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲप उपलब्ध
करून दिले आहे तथापि प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना (PMKISAN ) व अन्य
महत्वाच्या कामामुळे या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे असे दिसून येते . या मोबाईल ॲपवर
राज्यात आज अखेर फक्त ६८५ शेतकरी यांची नोंदणी झालेली दिसते .
अ.क्र.
|
विभाग
|
जिल्हा
|
तालुका
|
दिनांक २८ .२.२०१९ अखेर नोंदणी झालेले शेतकरी
संख्या
|
1.
|
नाशिक
|
नाशिक
|
दिंडोरी
|
३१३
|
2.
|
नागपूर
|
नागपूर
|
कामठी
|
४
|
3.
|
अमरावती
|
अमरावती
|
अचलपूर
|
१०८
|
4.
|
औरंगाबाद
|
औरंगाबाद
|
फुलंब्री
|
६०
|
5.
|
पुणे
|
पुणे
|
बारामती
|
१३४
|
6.
|
कोकण
|
पालघर
|
वाडा
|
६६
|
तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, प्रत्येक गावातुन किमान ३ ते ५ शेतकरी यांना प्रशिक्षण दिले आहे . त्यांचेशी योग्य समन्वय ठेवून आपण जास्तीत जास्त
शेतकरी या ॲपद्वारे पीक पाहणी ची माहिती तलाठ्याकडे पाठवतील असे
नियोजन करावे . सद्यस्थितीत या पथदर्शी प्रकल्प अंमलबजावणी मध्ये आपण स्वतः
पुढाकार घेवून ग्रामस्थरावरील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने प्रगतशील शेतकरी , केव्हीके केंद्र , आत्मा
बचत गट , विविध कार्यकारी सोसायटी , जिल्हा सहकारी बँक , शेतीनिष्ठ शेतकरी , विविध
तरुण मंडळे यांच्या सहकार्याने हे काम पुढे घेवून जाणे अपेक्षित आहे तरच आपल्याला
या पथदर्शी प्रकल्पातून अडचणी समजतील व आपण त्या दूर करु शकू असा मला विश्वास वाटतो . आपणास विनंती
करणेत येते कि आपल्या तालुक्यातून शेतकरी नोंदणी व पीक पाहणी नोंदी पाठविण्याचे
काम प्राधान्यक्रमाने घेणे बाबत संबंधी यांना निर्देश द्यावेत ही विनंती
आपला विश्वासू,
( रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत .-
मा. कृषी आयुक्त ,
महारष्ट्र राज्य , पुणे यांना माहितीसाठी
मा. विभागीय आयुक्त पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद , अमरावती व नागपूर
मा. विभागीय आयुक्त पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद , अमरावती व नागपूर
मा. मुख्य कार्यकारी
अधिकारी , जिल्हा परिषद - पुणे , नाशिक , पालघर
, औरंगाबाद , अमरावती व नागपूर
मा. जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी- पुणे , नाशिक ,
पालघर , औरंगाबाद , अमरावती
व नागपूर
मा. उप जिल्हाधिकारी तथा
डी.डी.ई. -पुणे , नाशिक ,
पालघर , औरंगाबाद , अमरावती
व नागपूर
मा. उप विभागीय अधिकारी / उप
विभागीय कृषी अधिकारी- बारामती , दिंडोरी
, वाडा , फुलंब्री , अचलपूर , कामठी
मा. तहसीलदार / तालुका कृषी अधिकारी /गट विकास
अधिकारी - बारामती , दिंडोरी , वाडा , फुलंब्री , अचलपूर , कामठी .
ई फेरफार प्रकल्प विभागीय
समन्वयक ( हेल्प डेस्क ) - पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद ,
अमरावती व नागपूर
Comments