रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

PM KISAN - प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना साठी २.०० हे.आर पेक्षा कमी क्षेत्राची यादी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

नमस्कार  मित्रांनो ,


PM KISAN  - प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी २.०० हे.आर पेक्षा कमी क्षेत्राची यादी तयार  करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 




     केंद्र शासनाने दि १.२.२०१९ रोजी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या प्रधाम मंत्री किसान सन्मान निधी  योजने अंतर्गत १.२.२०१९ रोजी २.०० हे.आर पेक्षा कमी शेतजमीन धारण करत असलेल्या शेतकरी कुटुंबाला ( पती पत्नी व अज्ञान अपत्ये )  वार्षिक ६००० रु. अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे . त्यासाठी मार्दर्शक सुचना  केंद्रशासनाचे वतीने दि १.२.२०१९ रोजी (कृ षि मंत्रालय, भारत  सरकार यांचेकडील पत्र क्र.F.no1-1/2019-Credit.1 Date 1 Feb 2019) निर्गमित केल्या आहेत . त्यासाठी राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई फेरफार प्रणाली मधून   २.०० हे पेक्षा कमी क्षेत्राचे खातेदारांची ८ अ प्रमाणे यादी प्राप्त करून घेणेची आहे . म्हणून ई फेरफार प्रणाली मध्ये  मेनू मधील अतिरिक्त अहवाल १ मधील खातेदारांची माहिती चे कृषक व अकृषक अशा दोन याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत  . या याद्या excel मध्ये export  करून download  करता येणार आहेत . या तील खातेदारांची माहिती ( कृषक ) ही यादी सर्व शेतीचे क्षेत्र धारण करणार्या सर्व खातेदारांची त्यांचे खात्यावरील चढत्या क्षेत्रा प्रमाणे असेल  त्यामधून २.०० हे पेक्षा कमी क्षेत्राची यादी व २.०० हे पेक्षा जास्त क्षेत्राची यादी  आपल्याला तत्काळ उपलब्ध होईल मात्र   त्यासाठी ई फेरफार व odc मधील खालील अहवाल निरंक केलेले असणे आवश्यक आहेत .

सबब तशी स्पष्ट सूचना या अहवालामध्ये देणेत आलेली आहे .

खातेदारांची माहिती बाबत महत्वाची सूचना :
खातेदाराची माहिती व गाव नमुना ८-अ या दोन्ही अहवालांची माहिती अचूक येण्यासाठी ODC
मधील पुढील अहवाल हे निरंक असणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
अहवाल १ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक.
अहवाल ५ : ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक
अहवाल ७ : खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
अहवाल ८ : फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे.
अहवाल १३ : भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही.
अहवाल १५. निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.
अहवाल २१. ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
अहवाल २२. शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
अहवाल २८. समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.
ODC अतिरिक्त अहवाल - खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
ODC अतिरिक्त अहवाल - अहवाल - 5
        या यादी तून २.०० हे च्या आतील ( परिशिष्ट अ ) व २.०० हे च्या वरील ( परिशिष्ट ब ) अश्या
दोन्ही याद्या तयार होतील .या यादी मध्ये महारष्ट्र शासनाच्या दिनांक ४.२.२०१९ च्या शासन निर्णया प्रमाणे
त्या खात्यावर समाविष्ट स.नं/ गट नं चे क्रमांक देखील उपलब्ध होतील .
कृषी गणना व  अन्य पर्यायांचा वापर करून कुटुंबातील अन्य सदस्याचे क्षेत्र व या सदस्यांनी
अन्य गावात धारण केलेले क्षेत्र विचारात घेवून अंतिम यादी तयार करता येईल.
         मात्र या पूर्वी वरील सर्व अहवाल निरंक करणे आवश्यक आहेत



सदरची सुविधा दि ६ .२.२०१९ रोजी दुपारी तलाठी लॉगीन ला उपलब्ध करून दिली आहे   .

आपला
रामदास जगताप
दि ४.२.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send