ई पीक पाहणी मोबाईल ॲप - तालुका स्थरीय कार्यशाळा
मार्गदर्शक सूचना क्र. ९७ रा.भू.अ.आ.का.4/रा.स./७ /2019
जमाबंदी आयुक्त
आणि संचालक भूमि अभिलेख,
( महाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे कार्यालय, पुणे
दिनांक:- 02/02/2019.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डीडीई
पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद , अमरावती व नागपूर
पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद , अमरावती व नागपूर
विषय :- पिकपाहणीच्या नोंदी
घेण्यासाठी गाव नमुना १२ मध्ये
दर्शविण्यासाठी भ्रमणध्वनी
ॲपद्वारे
शेतकऱ्यानी पाठविणेबाबत ची
कार्यशाळा .
संदर्भ:- कृषी आयुक्तालय पुणे येथील दिनांक 2
फेब्रुवारी 2019ची ई-पिकपाहणी
राज्यस्तरीय कार्यशाळा.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये ई-पिक पाहणीची राज्यस्तरीय कार्यशाळा कृषी आयुक्तालय,
पुणे येथे दिनांक 02/02/2019
रोजी संपन्न झाली. त्या कार्यशाळेतील सूचनांनुसार पथदर्शी प्रकल्प म्हणुन सहा महसुल
विभागातील निवडलेल्या सहा तालुक्यामध्ये ई-पिकपाहणीचे मोबाईल ॲपद्वारे पिकपाहणी नोदंविण्याचे
तालुकास्तरीय प्रशिक्षण खालीलप्रमाणे
आयोजित करण्यात निश्चित करणेत आलेले आहे.
अ.क्र.
|
विभाग
|
जिल्हा
|
तालुका
|
दिनांक
|
1.
|
नाशिक
|
नाशिक
|
दिंडोरी
|
४
फेब्रुवारी, 2019.
|
2.
|
नागपूर
|
नागपूर
|
कामठी
|
6 फेब्रुवारी,
2019.
|
3.
|
अमरावती
|
अमरावती
|
अचलपूर
|
5 फेब्रुवारी,
2019.
|
4.
|
औरंगाबाद
|
औरंगाबाद
|
फुलंब्री
|
४
फेब्रुवारी, 2019.
|
5.
|
पुणे
|
पुणे
|
बारामती
|
5 फेब्रुवारी,
2019.
|
6.
|
कोकण
|
पालघर
|
वाडा
|
6 फेब्रुवारी,
2019.
|
सदरच्या कार्यशाळेसाठी या तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, प्रत्येक गावातुन किमान ३ ते ५ शेतकरी
यांना प्रशिक्षणासाठी हजर राहणेबाबत
कळवावे. तसेच दिनांक 02/02/2019 रोजी ज्यांनी कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले आहे. ते या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर म्हणुन टाटा ट्रस्ट चे प्रतिनिधी
प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी आपले सोबत सहभागी होतील. सदरचा प्रकल्प हा पथदर्शी
प्रकल्प म्हणुन राबविणेचा आहे. त्यामुळे या मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यात आलेला पिकपाहणी बाबतचा डेटा
तात्काळ गा.न.नं. 12 मध्ये दाखविला जाणार नाही.
हा डेटा टेस्टिंग साठी
वापरणार असलो तरी त्याची अचूकता अत्यंत महत्वाची आहे . सबब सध्या चालु असलेली तलाठी स्तरावरील पिकपाहणी
मध्ये कोणताही बदल होणार नाही , ती ई फेरफार प्रणालीतील OCU मधून देखील पूर्ण
करावी . या तालुका स्थरीय कार्यशाळे नंतर स्थानिक कर्मचारी व प्रशिक्षित शेतकरी
यांचे मदतीने गाव पातळीवरील प्रशिक्षण दि ८.२.२०१९ पर्यंत पूर्ण करावे . त्यानंतर
या कार्यालाया कडून ई पीक पाहणी हे ॲप सर्वांना
वापसाठी उपलब्ध करून दिले जाईल ह्याची नोंद घ्यावी .
आपला विश्वासू,
( रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
Comments