रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तीन त्रुटी व त्या बाबतचे संदेश आणी दुरुस्ती च्या सुविधा दि ५.२.२०१९


तीन त्रुटी-सर्व्हे - खाते माहिती  या अहवालात दिली आहे अशा ७/१२ ची यादी 

अचूक कामकाजासाठी आज  दि ५.२.२०१९ पासून ई फेरफार प्रणाली मध्ये आणखी तीन चेक / अटी लावणेत आल्या आहेत.

१    १.      १ आर पेक्षा  जास्त क्षेत्राची तफावत असलेले अहवाल १ मधील ७/१२
२    २.     क्षेत्र  व   एकक चूक असलेले ७/१२ ( आर चौ.मी. मध्ये असलेले शेती चे ७/१२ व हे. आर. क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२ )
३    ३.   २० हे पेक्षा जास्त क्षेत्राचे शेतीचे ७/१२ व ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२

       आज पासून ई फेरफार व दस्त नोंदणी साठी अपात्र ठरविणेत आले आहेत ( BLOCK करणेत आले आहेत ) व त्यासाठी विशिष्ट मेसेज तेथे दर्शविणेत आले आहेत 

अशा ७/१२ ची यादी ई फेरफार मेनूमध्ये सर्व्हे - खाते माहिती मध्ये दर्शविली आहे


 वरील प्रमाणे दर्शविलेल्या तीनही त्रुटी दूर करणेसाठी च्या सुविधा कलम १५५ च्या आदेशाने
दुरुस्ती सुविधा मध्ये देणेत आलेल्या आहेत .

       या तीन त्रुटी  पैकी काही २० हे. अथवा ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले ७/१२ खरोखरच तसे असतील / योग्य असतील ते तलाठी हे  बाबत खात्री करून तहसीलदार  / डी बी ए यांना ऑनलाईन विनंती पाठवील त्या प्रमाणे तहसीलदार / डी बी ए यांनी एक वेळ असे ७/१२ योग्य असल्याचे मान्य केले पाहिजे . या नंतर असे ७/१२ ई फेरफार / दस्त नोंदणी ला पत्र समजले जातील .


या त्रुटी बाबतचे मार्गदर्शक  मेसेज  -

२० हे पेक्षा मोठे ७/१२ 

सूचना : जे ७/१२ कृषिक  आहेत त्या ७/१२ चे क्षेत्र जर 20 हेक्टर पेक्षा जास्त असल्यास अथवा  जे ७/१२ अकृषिक  आहेत त्या ७/१२ चे क्षेत्र जर 99 आर पेक्षा जास्त असल्यास त्यांचे क्षेत्र व एकक पुन्हा खात्री करणे आवश्यक आहे. 
या साठी २ पर्याय आपणास उपलब्ध आहेत.   पर्याय - १ : जर क्षेत्र दुरुस्ती चे काम अपूर्ण असल्यास - कलम १५५ च्या आदेशाने  क्षेत्र दुरुस्ती चा फेरफार घ्यावा.
पर्याय - २ : जर या ७/१२ चे क्षेत्र व एकक बरोबर असल्याची आपणास खात्री असल्यास या ७/१२ साठी एकदा तहसीलदार/नायब तहसीलदार यांची एकवेळ मान्यता घ्यावयाची आहे. 
सदर मान्यता घेण्यासाठी तहसीलदार/नायब तहसीलदार यांना User Creation Module मध्ये  गावातील वरील नमूद क्षेत्र गटानुसार जास्त क्षेत्र असलेले ७/१२ मान्यतेसाठी उपलब्ध केले आहेत, 
त्यानुसार कारवाई करावी.म्हणजेच स्थिती नुसार पर्याय - १ किवा पर्याय - २ चा वापर करूनच फेरफार घेता येईल याची नोंद घ्यावी.


क्षेत्र व एकक तफावती असलेले ७/१२ 

सदर ७/१२ हा कृषिक असून त्यावरील एकक हे अकृषिक ७/१२ चे म्हणजेच आर.चौ.मी.आहे \\nकिंवा\\nसदर ७/१२ हा अकृषिक असून त्यावरील एकक हे कृषिक ७/१२ चे म्हणजेच हे.आर.चौ.मी.आहे,
 तरी या ७/१२ चे एकक योग्य ते करून घ्यावे त्यानंतरच या ७/१२ वर फेरफार घेता येईल. 
या साठी २ पर्याय आपणास उपलब्ध आहेत.   पर्याय - १ : १५५ क्षेत्र दुरुस्ती आदेश. पर्याय - 2 : १५५  एकक बदल आदेश


अहवाल १ मधील १ आर पेक्षा जास्त क्षेत्राचे तफावत असलेले ७/१२ 

या ७/१२ वरील गाव नमुना ७ चे क्षेत्र व खातेदार यांचे एकूण क्षेत्र यामध्ये खूपच तफावत आहे - कदाचीत नमुना ७ चे क्षेत्र हे योग्य भरले आहे (क्षेत्र व एकक) परंतु खातेदाराचे क्षेत्र हे चौरस मीटर मध्ये नमूद आहे. यामुळे सदर ७/१२ इ-फेरफार मध्ये फेरफारा साठी घेण्या अगोदर अहवाल-१ दुरुस्तीचा १५५ कलम खाली फेरफार घेऊन योग्य त्या क्षेत्राच्या दुरुस्त्या पूर्ण कराव्यात.



दुय्यम निबंधक यांचे स्थरावरील मेसेज 

=========

अकृषिक:-

सदर /१२ हा अकृषिक असून त्यावरील एकक हे कृषिक /१२ चे म्हणजेच हे.आर.चौ.मी.आहे , तरी या /१२ चे एकक संबंधित तलाठी यांचे मार्फत  आर.चौ.मी करून घ्यावे त्यानंतरच या /१२ वर दस्त नोंद  घेता येईल याची नोंद घ्यावी.;

कृषिक:-

सदर /१२ हा कृषिक असून त्यावरील एकक हे अकृषिक /१२ चे म्हणजेच आर.चौ.मी.आहे , तरी या /१२ चे एकक संबंधित तलाठी यांचे मार्फत  हे.आर.चौ.मी करून घ्यावे त्यानंतरच या /१२ वर दस्त नोंद  घेता येईल याची नोंद घ्यावी

अकृषिक:-

सदर  /१२ हा २० हेक्टर पेक्ष्या मोठा आहे,  परंतु या  /१२ चे क्षेत्र योग्य असल्याचा शेरा तलाठी / तहसीलदार यांचे स्तरावर प्रलंबित आहेतरी तलाठी यांचे  मार्फत सदर  /१२ चे  क्षेत्र यॊग्य असल्याची कार्यवाहीपूर्ण करून घ्यावी . त्यानंतर हा /१२ दस्त नोंदणी साठी उपलब्ध होईल कृपया याची नोंद घ्यावी. !!!

कृषिक:-

सदर  /१२ हा ९९ आर  पेक्ष्या मोठा आहे,  परंतु या  /१२ चे क्षेत्र योग्य असल्याचा शेरा तलाठी / तहसीलदार यांचे स्तरावर प्रलंबित आहेतरी तलाठी यांचे  मार्फत सदर  /१२ चे  क्षेत्र यॊग्य असल्याची कार्यवाहीपूर्ण करून घ्यावी . त्यानंतर हा /१२ दस्त नोंदणी साठी उपलब्ध होईल कृपया याची नोंद घ्यावी. !!!

अहवाल १ मधील प्रतिबंधित ७/१२ 

सदर /१२ हा अहवाल  मध्ये क्षेत्राची तफावत  .०१ पेक्ष्या जास्त असल्यामुळे तलाठी यांचे मार्फत सदर  /१२ चे  क्षेत्रा बाबत  यॊग्य  कार्यवाही पूर्ण करून घ्यावी . त्यानंतर हा /१२ दस्त नोंदणी साठी उपलब्धहोईल कृपया याची नोंद घ्यावी. !!!

नोट : जरी आपण 20 हेक्टर पेक्षा मोठ्या जमिनीसाठी चेक ठेवला आहे तरी आपण तलाठी म्हणून आपल्या गावातील सर्व जमिनींचे क्षेत्र व एकक तपासून योग्य त्या दुरुस्त्या करावयाच्य आहेत. आता आपला ७/१२ ची माहिती ही वेगवेगळ्या योजनासाठी देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक ७/१२ हा सर्व  बाबीने  अचूक असावा याची आपणास काळजी घ्यावयाची आहे 

Comments

Archive

Contact Form

Send