रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बदली होवून नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार , उप विभागीय अधिकारी व डी.डी.ई यांचे नवीन नोंदणी करणे बाबत


   क्र. रा.भू.आ.का.४ /रा.स./११ /२०१९
   जमाबंदी आयुक्त आणि संचालक
   भूमी अभिलेख ( म.राज्य ) ,पुणे
   दिनांक २५.२.२०१९
           प्रति ,
       मा. उप आयुक्त ( महसूल ),
           विभागीय आयुक्त कार्यालय ( सर्व )       मा. उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)
             विषय : बदली होवून नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार , उप विभागीय अधिकारी व डी.डी.ई                      यांचे नवीन नोंदणी  करणे बाबत
 मोह्दय ,            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या पार्श्वभुमीवर राज्यातील बहुतांश तहसीलदार व उप विभागीय अधिकारी , उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.  यांच्या बदलीने पदस्थापना करणेत आल्या आहेत. शासन आदेशाप्रमाणे  तहसीलदार, उप विभागीय अधिकारी व डी.डी.ई. पदावर नव्याने रुजू  झालेल्या सर्व तहसीलदार, उप विभागीय अधिकारी व डी.डी.ई. यांची नोंदणी ई फेरफार प्रणालीत USER CREATION मधून करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

१)       शासन आदेशाची एक प्रत आपले जिल्ह्याचे डी.डी.ई. यांना उपलब्ध करून घ्यावी व त्या प्रमाणे बदली होवून अन्य जिल्ह्यात  गेलेल्या अधिकाऱ्यांना स्थिती बदला करून त्या त्या  जिल्ह्यासाठी कार्यमुक्त करावे.
२)       अन्य जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात बदलून आलेल्या अधिकार्यांना डी.डी.ई. यांनी USER CREATION मधून योग्य पदस्थापने प्रमाणे तालुका / उप विभाग नोंदणी करावी.
३)       ज्या अधिकाऱ्यांची नोंदणी ई फेरफार प्रणालीत या पूर्वी करणेत आलेली नाही त्यांचा पगारपत्रकातील सेवार्थ आय.डी. वापरून व बोटांचे ठसे नोंदवून नोंदणी पूर्ण कारावी .४)       डी.डी.ई. यांची नोंदणी उप आयुक्त महासूल यांनी प्रथम करावी त्याशिवाय डी.डी.ई. यांना अन्य अधिकाऱ्यांची नोंदणी करता येणार नाही.५)       डी.डी.ई.यांनी सर्व तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांची नोंदणी तातडीने पूर्ण  करावी अन्यथा या अधिकारी यांना ई फेरफार प्रणालीत कोणतेही काम करता येणार नाही पर्यायाने कलम १५५ च्या आदेशाने ७/१२ वरील दुरुस्ती सुविधा वापरता येणार नाही. त्यामुळे आपणास विनंती करणेत येती कि बदली ने पदावर नव्याने रुजू झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची नोंदणी प्रक्रिया तत्काळ मोहीम स्वरूपात  पूर्ण करवी . हि विनंती
                 सदरच्या सूचना सर्व संबंधिताच्या  निदर्शाणास  आणाव्या ही विनंती .                                                                                        आपला विश्वासू
                                                                                                                                                                              (रामदास जगताप)
   राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प  जमाबंदी आयुक्त कार्यालय , म.रा. पुणे

प्रत ,
    उप विभागीय अधिकारी (सर्व )
    तहसीलदार (सर्व )


Comments

Archive

Contact Form

Send