संगणकीकृत नकलांच्या नक्कल फी बाबतच्या शासन निर्णयाचे अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना दि ३१.१.२०१९
नमस्कार मित्रांनो ,
आपला रामदास जगताप दि ३१.१.२०१९
विषय:- संगणकीकृत नकलांच्या नक्कल फी बाबतच्या शासन निर्णयाचे अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना.
संदर्भ :- शासन निर्णय क्रमांक राभूअ-2018/प्र.क्र.34/ल-१ दिनांक 31 जानेवारी, 2019.
ई फेरफार प्रकल्प कार्यान्वित करणारी यंत्रणा म्हणून मा.
जमाबंदी आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली असलेली महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था
सक्षम करण्यासाठी शासनाने संदर्भात नमुद दिनांक ३१/01/२०१९ रोजी शासनाने निर्गमित
केली आहे. यामध्ये संगणकीकृत ७/१२, ८ अ, फेरफार, नमुना ९ ची नोटीस इत्यादी च्या नक्कल फी मधील काही हिस्सा
महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेला व काही हिस्सा तलाठी यांन कागद, प्रिंटींग, वीज
बिल इत्यादी खर्चासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सदरच्या शासन निर्णयाची दिनांक 0१/0२/२०१९ पासून
संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करावयाची आहे त्यासाठी अशा पद्धतीने नकला वितरणासाठी
ऑनलाईन नक्कल फी व्यवस्थापन प्रणाली NIC पुणे यांचे मदतीने विकसित करणेत येत आहे तथापि तोपर्यंत या
शासन निर्णयाची अंमलबजावणी कारणेसाठी खालील प्रमाणे सूचना देणेत येत आहेत.
१. प्रत्येक तलाठी यांनी प्रत्येक
तलाठी साझा साठी या सोबत विहित केलेल्या नमुन्यात एक नक्कल फी नोंदवही ठेवावी.
|
अ.क्र.
|
दिनांक
|
गावाचे
नाव
|
अर्जदाराचे
/ नक्कल मागणीदाराचे नाव
|
नकलेचा
प्रकार ( ७/१२ , ८ अ , फेरफार इ.)
|
नकलांची
संख्या
|
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
|
१५
रु प्रती प्रत प्रमाणे नक्कल फी (रुपये)
|
नक्कल
फी मधील तलाठी हिस्सा(१० रु.प्रमाणे) (रुपये)
|
नक्कल
फी मधील महाभूमी संस्थेचा हिस्सा ( ५ रु
प्रमाणे ) (रुपये)
|
नक्कल
मिळाल्या बाबत स्वाक्षरी
|
शेरा
|
|
7
|
8
|
9
|
10
|
11
|
२. तलाठी लॉगीनने वितरणासाठी प्रिंट घेणेत येणाऱ्या
प्रत्येक नकलेच्या प्रतीवर या नोंदवहीतील अनु क्रमांक नमूद करून तलाठी यांनी नकलेवर
स्वाक्षरी करून / डिजिटल स्वाक्षरीने नक्कल वितरीत करावी.
३. तलाठी लॉगीनने शासकीय कामासाठी
प्रिंट घेणेत येणाऱ्या प्रत्येक नकलेच्या प्रतीवर या नोंदवहीतील अनुक्रमांकचे
ठिकाणी शासकीय कामासाठी असे नमूद करून नक्कल फी रु.१५/- प्राप्त या ऐवजी शासकीय
कामासाठी विनाशुल्क असे नमूद करून नक्कल स्वाक्षरीत / डिजिटल स्वाक्षरीत करावी व
तशी नोंद या नोंदवहीत योग्य ठिकाणी घेणेत यावी.
४. खातेदार / अर्जदार / मागणीदार यांना
वितरीत केल्या जाणाऱ्या एकाही नकलेवर नोंदवही वरील अनु क्रमांक न लिहिता अशी नक्कल
वितरीत होणार नाही अशी दक्षता घेणेत यावी .
५. प्रत्येक सप्ताहातील प्राप्त नक्कल
फी पैकी ५/- रु.प्रमाणे महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेची हिस्सा फी जमाबंदी
आयुक्त कार्यालयाच्या SBI DEPOSITORY
ACCOUNT मध्ये पुढील आठवड्यातील पहिल्या कार्यालयीन
कामकाजाच्या दिवशी चलनाने बँकेत जमा करावी. बँक खाते क्रमांक ( IFCS Code सह ) लवकरच कळविणेत येईल.
६. सदरची नोंदवही तहसीलदार कार्यालयातून पृष्ठांकित करून
घेणेत यावी.
७. खातेदाराने अन्य ठिकाणाहून नकलेच्या
प्रिंट घेतल्या असल्यास तलाठी यांना नक्कल फी वसूल करता येणार नाही.
८. नकलेच्या खाली या प्रमाणित प्रतीसाठी र.रु.१५/- प्राप्त असे छापले जाते त्याचे खाली सही करून
नक्कल देण्यात यावी. यासाठी कोणतीही स्वतंत्र पावती देण्याची आवश्यकता नाही.
९. तहसीलदार यांनी दरमहा ही नोंदवही व
चलने पाहून महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था / शासनाचा हिस्सा जमा केला असल्याची
खात्री करावी.
१० SBIePAY यांचे आधारे ऑनलाईन रक्कम स्वीकारणेसाठी च्या सुविधेसह
ऑनलाईन नक्कल फी व्यवस्थापन प्रणाली ( ONLINE COPYING
FEE MODULE )कार्यान्वित होईपर्यंत सदरची नोंदवही व
कार्यपध्दती वापरात राहील.
११. सदरची नोंदवही वित्तीय नियमा
प्रमाणे तपासणीसाठी व लेखा परीक्षणासाठी पात्र राहील.
सदरच्या
सूचना आपले अधिनस्त सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात
तसेच जतनेच्या माहितीसाठी सदरचा शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना यांना व्यापक
प्रसिध्दी देण्यात यावी.
आपला रामदास जगताप दि ३१.१.२०१९
सर, 20 रुपये फी करावी, घ्यायला व द्यायला सोपे होईल
ReplyDeleteमहोदय,
ReplyDeleteहा निर्णय खूपच छान झाला आहे सर. चलन भरण्याची मुदत हि प्रत्येक आठवड्या ऐवजी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा १५ दिवसानंतर एकदा केली तर खूप बरे होईल.
7/12 fee hi 20 rs karavi.... Chalan bharnechi mudat hi 15 divsani karavi.....
ReplyDelete