रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नक्कल फी चा शासन निर्णय ई फेरफार प्रकल्पासाठी ठरणार मैलाचा दगड .

नमस्कार मित्रांनो विषय - “महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था सक्षम करण्याबाबत व नक्कल फी बाबत चा शासन निर्णय ” अनेक दिवसांपासून ज्या साठी प्रयत्न चालू होते तो शासन निर्णय आज दि ३१.१.२०१९ रोजी शासनाकडून निर्गमित झाला तो म्हणजे “महाभूमम प्रकल्प व्यवस्थापन संस्था सक्षम करण्याबाबत ” चा शासन निर्णय . या मध्ये ई फेरफार प्रकल्पातून संगणकीकृत झालेले ७/१२ , ८ अ , फेरफार व नमुना ९ ची नोटीस इत्यादी नकला वितरणा बाबतचे शासनाचे धोरण निश्चित झाले आहे व या नक्कल फी मधून काही रक्कम तलाठी यांना कागद , शाही , प्रिंटर मेंटेनन्स , लाईट बील ई खर्चासाठी उपलब्ध होणार आहेतर काही रक्कम या ई फेरफार प्रकल्पाच्या विकसन , सपोर्ट , देखभाल दुरुस्ती साठी खर्च करता येणार आहे त्या मुळे हा शासन निर्णय अपुऱ्या सुविधांसह ७/१२ संगणकीकरणाचे रात्रंदिवस काम करणाऱ्या माझ्या तलाठी बांधवांसाठी व एकूणच ई फेरफार प्रकल्पासाठी नवी दिशा देणारा ठरेल तसेच हा प्रकल्प सक्षमरीत्या चालविण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणारा एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल .मा. महसूल मंत्री महोदयांच्या मान्यतेनंतर वित्त विभागाला या वैशिष्ट्यपूर्ण व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पाचे पटवून देण्यास मा.अप्पर मुख्य सचिव ( महसूल ) व मा. जमाबंदी आयुक्त साहेब यशस्वी झाले व त्यास सकारात्मक प्रतिसाद देवून मा. वित्त सचिव महोदयांनी सहमती दर्शविली म्हणूनच हे शक्य झाले आहे . गेले अनेक दिवस हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांच्या कष्टाला निश्चित चांगली फळे येतील असा मला विस्वास वाटतो म्हणूच हा शासन निर्णय ई फेरफार प्रकल्पासाठी मैलाचा दगड ठरेल हे मात्र निश्चित . आपला रामदास जगताप दि ३१.१.२०१९

Comments

  1. सर या प्रकल्पासाठी आपण घेत असलेली मेहनत,आपलं योगदान अतुल्य आहे. आपल्या प्रयत्नांना त्रिवार मनाचा मुजरा

    ReplyDelete
  2. सर नमस्कार
    जिंदगी मे कुछ नेक काम ऐसे भी करने चाहिए जिनका खुदा के सिवा कोई दुसरा गवाह ना हो
    आपने हमारी उम्मीद को चार चांद लगा दिए आपकी तमाम कोशिस रंग लाई है. हमारे कुछ भाइ लोगो को इस के खातिर नोकरी से हाथ धोना पड़ा है अब हमें राहत की सांस मिली है उस के साथ स्पीड का भी काम होना जरुरी है
    लाख सलाम 🙏

    ReplyDelete
  3. आपला सततचा पाठपुरावा व तलाठी बांधवांचे कष्ट यांचे फळ

    ReplyDelete
  4. योग्य निर्णय परंतु सप्तहिक भरण्यास काही अडचण आल्यास महिन्याच्या शेवटच्या हप्यात भरण्याची सुविधा असावी तेपण ऑनलाईन चलानाणे ।

    ReplyDelete
  5. सर 7/12करिता दुसरी कोणती वेबसाईट आहे काय?

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send