रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तलाठी साझा व महसूल मंडळ नोंदणी करण्याबाबत

मार्गदर्शक सूचना क्र.८२ क्र.रा.भू.अ.आ.अ.४/रा.स./ ८२ / २०१८ जमाबंदी आयुक्त कार्यालय ( महारष्ट्र राज्य ) , पुणे यांचे कार्यालय दि ६.१२.२०१८ प्रति, मा. उप जिल्हाधिकारी तथा डी,डी.ई. ( सर्व ) विषय :- तलाठी साझा व महसूल मंडळ नोंदणी करण्याबाबत आपण ई फेरफार प्रकल्प राज्यात कार्यान्वित करून २/३ वर्षे होवून देखील अनेक जिल्ह्यात तलाठी साझा व महसूल मंडळांची निर्मिती ई फेरफार प्रणालीत करणेत आलेली नाही असे दिसून येत आहे . हे काम पुर्ज करण्याची जबाबदारी प्रत्येक तालुक्याच्या डी.बी.ए. यांची होती . डी.बी.ए. यांच्या usercreation लॉगिन मध्ये तलाठी साझा व महसूल मंडळ तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी खालील दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक डी.बी.ए. यांनी तलाठी साझा व महसूल मंडळ तयार करावे. तलाठी साझा तयार करणे :- १. Usercreation मध्ये डी.बी.ए. यांनी लॉगिन करावे व सर्व प्रथम साझा तयार करावा त्यासाठी “नवीन गाव-साझा-गटवारी ची नोदंणी” या पर्यायाला टिक करावे व “साझा तयार करा” या पर्यायाला क्लिक करावे. २. “साझा तयार करा” या पर्यायाला टिक केल्यानंतर “नविन” या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला तालुक्यातील सर्व गावांची नावे उपलब्ध होतील त्यापैकी साझाचे नाव असणारे गाव निवडावे. ३. साझाचे नाव असणारे गाव निवडल्यानंतर सदर साझासाठी कोड तयार होईल (उदा. १, २, ३) व त्या साझामध्ये सदर गाव निवडा होईल. त्यानंतर सदर साझा मधील असणारी इतर गावे निवडा करावित व साठवा बटनावर क्लिक करावे. ४. साठवा केल्यानंतर “साझा नोंद दुरुस्त झाली आहे” असा मेसेज येईल व सदर साझा तयार झालेला असेल. महसूल मंडळ तयार करणे :- १. Usercreation मध्ये डी.बी.ए. यांनी लॉगिन करावे व सर्व प्रथम महसूल मंडळ तयार करावा त्यासाठी “नवीन गाव-साझा-गटवारी ची नोदंणी” या पर्यायाला टिक करावे व “महसूल मंडळ नोंदणी” या पर्यायाला क्लिक करावे. २. “महसूल मंडळ नोंदणी” या पर्यायाला टिक केल्यानंतर “नविन” या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला तालुक्यातील आपण तयार केलेल्या सर्व साझांची नावे उपलब्ध होतील त्यापैकी मंडळाचे मुख्यालय असणारे साझा चे नाव निवडावे . ३. मंडळाचे नाव असणारा साझा निवडल्यानंतर सदर मंडळासाठी कोड तयार होईल (उदा. १, २, ३) व त्या मंडळामध्ये साझा निवडला जाईल . त्यानंतर सदर मंडळामधील असणारी इतर साझा निवडा करावेत व साठवा बटनावर क्लिक करावे. ४. साठवा केल्यानंतर “मंडळाची नोंद यशस्वीरीत्या झाली आहे” असा मेसेज येईल व सदर मंडळ तयार झालेले असेल . सध्या फक्त अस्तित्वात असलेली महसूल मंडळे व तलाठी साझा निर्माण करावेत . तलाठी साझा पुनर्रचने प्रमाणे मंडळे व साझा निर्मिती अंतिम झाल्या नंतर पुन्हा करता येईल. यापूर्वीच साझा तयार केले असतील आणि जर साझा पुनर्चना झाल्याने नवीन तयार साझा करावाचे असल्यास सर्व जुने साझे दुरुस्त करावेत व नवीन साझे नवीन बटन वापरून तयार करावेत त्याच प्रमाणे मंडळ पुनर्रचना करता येईल . सोबत तलाठी साझा व महसूल मंडळ तयार करण्यासाठी चे युजर म्यानुअल जोडले आहे . सदरची कार्यवाही दि १०.१२.२०१८ पूर्वी पूर्ण करून पूर्तता अहवाल डी डी ई यांनी या कार्यालयाकडे पाठवावा . सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व डी.बी.ए. यांचे निदर्शनास आणाव्यात . हि विनंती . आपला विश्वासू ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय ( म.रा.) , पुणे प्रत - मा. उप आयुक्त ( महसूल ) , विभागीय आयुक्त कार्यालय ( सर्व ) प्रत- उप विभागीय अधिकारी ( सर्व ) प्रत – तहसीलदार ( सर्व )

Comments

  1. Respected Sir,
    Eka khatedarachi chukun 2-3 vyaktik khati zali aahet.Khate ektrikaran option reedit / e-ferfar madhun vaprun 1 khate hot nahi... requesting your guidance...thanx & regards.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send