फेरफार रि-एंट्री सुविधे बाबत.मार्गदर्शक सूचना क्रमांक ८९ दि २८.१२.२०१८
मार्गदर्शक सूचना क्रमांक -८९ रा.भू.अ.आ.का.४/रा.स./८९ /२०१८
मा. जमाबंदी आयुक्त
आणि संचालक
भूमी अभिलेख (म.राज्य)
पुणे यांचे कार्यालय
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई.(सर्व.)
विषय :- ई-फेरफार प्रणाली अंमलबजावणी फेरफार रि-एंट्री सुविधे बाबत.
महोदय,
ई-फेरफार प्रणालीची सध्या राज्यभर अंमलबजावणी केली जात असली तरी अनेक सुविधा व्यवस्थित उपयोगात न आणल्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी काही अडचणींना सामोरे जावे लागते. यापैकी फेरफार रि-एंट्री सुविधे बाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
1. कोणताही फेरफार अनोंदणीकृत मधुन घेतल्यानंतर अथवा नोंदणीकृत मधुन SRO कडुन प्राप्त माहितीच्या आधारे तयार केल्यानंतर अथवा फेरफार अंमल झाल्यानंतर 7/12 वर काय व कसे परिणाम होतील? हे पुर्वविलोकन द्वारे दाखविले जाते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पुर्वावलोकन (Preview) पाहणे अत्यावश्यक आहे.
2. नमुना-9
ची नोटीस काढण्या अगोदर व मंडळ अधिकारी यांनी "पुर्वावलोकन शेरा”
नामंजुर केल्यानंतर खालील फेरफारांची री-एंट्री
करता येत नाही त्यामुळे खालील दिलेले सर्व फेरफार साठवा करण्यापुर्वी योग्य आहेत
का? हे तलाठी यांनी साठवा करण्यापुर्वी तपासावे त्यानंतरच साठवा करावेत.
·
वारस
·
मयताचे नाव कमी करणे
·
राजपत्राने नावात बदल
·
अ.पा.क शेरा कमी करणे
·
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
·
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
·
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
·
बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
·
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
·
सर्व्हे/गट अदलाबदली
·
विश्वस्त खाते वगळून वारस नोंद
·
कोर्ट आदेशाने वारस नोंद
·
क्षेत्र दुरुस्तीचा आदेश (template)
·
क्षेत्र दुरुस्तीचा आदेश (शेती) (template)
·
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
·
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
·
कलम १५५ च्या आदेशाने सर्व फेरफार प्रकार.
·
कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती.
·
चूक दुरुस्ती फेरफार.
·
3. वरील दिलेल्या फेरफारा व्यतिरिक्त फेरफारांची री-एंट्री
करता येईल व नमुना-9 ची नोटीस काढण्या अगोदरही री-एंट्री करता येईल शिवाय मंडळ
अधिकारी यांनी "पुर्वावलोकन शेरा” नामंजुर करुन री-एंट्री करता येत येईल.
4. एखाद्या फेरफारामध्ये अनेक सर्व्हे नंबर असल्यास
मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजुर करताना प्रत्येक सर्व्हेचे पुर्वावलोकन पाहावे
पुर्वावलोकन बरोबर असल्यास तो सर्व्हे मंजुर करुन घ्यावा परंतु त्यातील एखाद्या
सर्व्हे नंबरचे पुर्वावलोकन बरोबर नसल्यास व त्याचे "पुर्वावलोकन शेरा”
नामंजुर केल्यास मंडळ अधिकारी यांनी त्या फेरफाराचे मंजुरीचे काम थांबवू नये त्या
फेरफारातील सर्व सर्वे /गट नं.चा मंजुर/नामंजुर पुर्वावलोकन शेरा भरूनच फेरफार निर्गत करावेत.
5. जर मंडळ अधिकारी यांनी काही सर्व्हेचे "पुर्वावलोकन
शेरा” नामंजुर केले व इतर सर्व्हे मंजुर न करता ठेवल्यास तलाठी यांनी त्या
फेरफारातील सर्व सर्व्हे नंबरची री-एंट्री करणे आवश्यक आहे. याची कृपया नोंद
घ्यावी अन्यथा फक्त री एन्ट्री केलेल्या स.नं/ गट नं. वरच अंमल होईल ह्याची नोंद
घ्यावी .
6. तलाठी यांना मंडळ अधिकारी यांनी पुर्वविलोकन अयोग्य नमुद करुन मार्क केलेले स.नं./गट नं. रि-एंट्री साठी उपलब्ध होतील त्यावर आवश्यक ती दुरुस्ती करुन तलाठी यांनी सदरची दुरुस्ती करुन तलाठी यांनी सदरची दुरुस्ती साठवा केल्यानंतर या फेरफारातील असे स.नं./गट नं.मंडळ अधिकारी यांना मंजुरीसाठी उपलब्ध होतील त्यावर मंडळ अधिकारी यांनी पुन्हा पुर्वविलोकन पाहून अंमल योग्य होत असल्यास फेरफार पुन्हा प्रमाणीत करावा त्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीत 7/12 वर योग्य अंमल झाला नसल्यास मंजूर फेरफाराचा योग्य अंमल न झालेल्या 7/12 दुरुस्तीसाठी चुक दुरुस्ती फेरफार (https://....../chuk_durusti) ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे तससिलदार यांची युजर क्रियेशन मधुन रितसर ऑनलाईन मान्यता घेऊन परिशिष्ट-क प्रमाणे फेरफार दुरुस्तीचा आदेश घेवून योग्य तो अंमल घेता येईल. थोडक्यात रि-एंट्री केलेला फेरफार दोनदा मंजूर करावा लागेल व मंडळ अधिकारी यांनी दुसऱ्यांना दिलेला मंजूरीचा शेरा फेरफार रजिस्टरवर छापला जाईल. सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास
आणाव्यात ही विनंती .
आपला विश्वासू,
(रामदास
जगताप)
राज्य समन्वयक, ई-फेरफारप्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत:- उपआयुक्त (महसूल) (सर्व.)
उपविभागीय आयुक्त (सर्व.)
यांना माहितीसाठी व उचित कार्यवाही साठी.
नमुना-9 ची नोटीस काढण्या अगोदर मृत्यूपत्राची नोंद re entry साठी उपलब्ध होत नाही...
ReplyDelete