हवेली तालुका झाला ऑनलाईन
नमस्कार मित्रांनो ,
हवेली तालुका झाला ऑनलाईन
पुणे जिल्ह्यातील अत्यंत मोठा व महत्वाचा आणि कामकाजासाठी किचकट तालुक्यातील ७/१२ व ८ अ अचूक करण्यासाठी एडीट व री एडीट चे काम करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून हवेली तालुक्याचे काम हवेली प्रांताधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या सर्वर वरून सुरु होते आता ते काम पूर्ण झाले असून सर्व गावांचे घोषणापत्र १,२,३ पूर्ण करून तहसीलदार हवेली यांनी ऑनलाईन प्रख्यापण आदेश पारित केला आहे व आज दिनांक १८.१२.२०१८ पासून हवेली तालुका ऑनलाईन करून डेटाबेस सुधारणा फेज १ चे काम देखील पूर्ण करून आज साय ६.०० वाजल्या पासून हवेली तालुका तलाठी मंडळ अधिकारी व दुय्यम निबंधक यांना ऑनलाईन कामकाजासाठी उपलब्ध करून देनेत आला आहे त्यामुळे हवेली तालुक्यातील खातेदारांना महाभूलेख संकेत स्थळावरून अद्ययावत ७/१२ व ८ अ उपलब्ध होतील या मध्ये अजून देखील काही त्रुटी खातेदारांना दिसून आल्या तर तलाठ्याकडे अर्ज करून ७/१२ तहसीलदार यांच्या कलम १५५ अंतर्गत आदेशाने दुरुस्त करता येतील .
उद्या पासून हवेली तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दुय्यम निबंधक यांनी ऑनलाईन पद्धतीने दस्त नोंदणी करणे च्या सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालया कडून देनेत आल्या आहेत
आपला
रामदास जगताप
दि १८.१२.२०१८
Comments