पुणे महसूल विभागातील ५२ पदोन्नत नायब तहसीलदार यांना मार्गदर्शन -दि २९.११.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
आज पुणे महसूल विभागातील ५२ अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाली .
प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण .
सर्व पदोन्नत अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन या सर्व नायब तहसीलदार यांना पुणे सांगली , सातारा , सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यात पदस्थापना मिळाली आहे .
आज पासून हे महसूल कर्मचारी राजपत्रित अधिकारी झाले त्यांना पुढील कालखंडात पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या अधिक सक्षमरीत्या पार पडता याव्यात म्हणून
विभागीय आयुक्त मा. दीपक म्हैसेकर साहेब व उप आयुक्त महसूल यांचे सूचनेप्रमाणे या सर्व पदोन्नत अधिकारी यांना ई फेरफार प्रकल्पा सह सातबारा संगणकीकरण व आपली चावडी , डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , आधार सीडिंग , ई पीक पाहणी MOBILE AAP , eQJcourts , ई हक्क , ई चावडी ई बाबत व कार्यालयात dba म्हणून या मधील त्यांची जबाबदारी
या विषयावर दोन तासाचे मार्गदर्शन विधान भवन , पुणे येथे घेणेत आले . या सर्व अधिकार्यांना पारदर्शक व गतिमान डिजिटल कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा
..........रामदास जगताप
दि २९.११.२०१८
Comments