ODC मधील अतिरिक्त अहवाल -५ ची दुरुस्तीबाबत मार्गदर्शक सूचना दि ८.१०.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
मार्गदर्शक सूचना क्र.७३ जा. क्र./रा.भू.अ.आ.का.4/रा.स./73/2018.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक,
भूमि अभिलेख कार्यालय (म.राज्य) पुणे.
दिनांक ८ /10/2018.
प्रति,
डि.डि.ई. तथा उपजिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय, ( सर्व )
विषय :- ODC मधील अतिरिक्त अहवाल -५ ची दुरुस्तीबाबत
ई-फेरफार आज्ञावलीत सुरळीत कामकाज होण्यासाठी गाव न.नं. ७/१२ व ८अ अचूक असणे आवश्यक आहे . आज्ञावलीमध्ये अशा तफावती दुर करण्यासाठी Edit व Re-Edit MODULE उपलब्ध करून दिले होते. Edit व Re-Edit MODULE मधुन ७/१२ व ८अ यामधील तफावत दुर करुन प्रत्येक ऑनलाईन गाव न.नं ७/१२ व ८अ ची तपासणी हस्तलिखित प्रमाणे करुनच घोषणापत्र -३ देणे आवश्यक होते. तथापि ७/१२ व ८अ ची तपासणी करताना अनेक ठिकाणी फक्त ७/१२ ची तपासणी केली व ७/१२ योग्य आहे याची खात्री झाल्यावर घोषणापत्र -३ दिले परंतु ब-याच ठिकाणी असे निरर्दशास आले की ७/१२ जरी योग्य असला तरी ७/१२ वरील खात्यामध्ये नावांची संख्या जास्त आहे व खात्यातील जास्त होणा-या नावांचे दुसरे ७/१२ सदर खात्यामध्येच सामविष्ट झालेले आहे. त्याशिवाय असेही निदर्शनास आले की खात्यातील नाव व ७/१२ वरील नाव हे एकच आहे परंतु त्या नावांच्या अक्षरामध्ये फरक आहे. असे फरक निर्माण झालेले सर्व अहवाल ODC MODULE मध्ये उपलब्ध करून दिले आहेत . ODC मधील अहवाल-५ (7/12 व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फरक), अतिरिक्त अहवाल-११ ( खातामास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे ), अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल-५) व अतिरिक्त अहवाल-१३ (अहवाल-५.१) मध्ये दिलेले सर्व अहवाल निरंक केल्याशिवाय अचूक ७/१२ व ८ अ चे ध्येय सध्या होणार नाही . सदरचे अहवाल निरंक करण्याची कार्यपद्धती खालील प्रमाणे आहे .
१. सर्व प्रथम ODC मधील अहवाल-५ (7/12 व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फरक ) दुर करणे आवश्यक आहे. सदर अहवालाची दुरुस्ती सुविधा - 2 ( 7/12 वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे ) मध्ये फक्त एका क्लिकवर होते व त्याची ODC मधुनच मान्यता घ्यावी.
२. त्यानंतर ODC मधील अतिरिक्त अहवाल-११ ( खातामास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे ) दुरुस्ती करावा त्यासाठी दुरुस्ती सुविधा क्र -19 मधुन एक एक खाते निवडून खातामास्टर वरील अतिरिक्त नावे नष्ट करावी.
३. वरील दोन्ही अहवाल दुरुस्ती केल्यानंतरच ODC मधील अतिरिक्त अहवाल-१२ ( अतिरिक्त अहवाल-५ ) पाहावा त्यामध्ये तलाठी यांना एकाच खात्यातील सर्व किंवा काही ७/१२ वरील संख्या असमान असलेले किंवा खात्यातील व ७/१२ वरील नावाच्या स्पेलिंग मध्ये फरक असलेले सर्व सर्व्हे नंबर दिसतील.
४. ODC मधील अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल-५) पाहुनही आपणास त्याचे आकलन होत नसल्यास पुढील अतिरिक्त अहवाल-१३ (अहवाल-५.१) पाहावा. त्यामध्ये खाते निवडा केल्यावर खातामास्टर वरील सर्व नावे दिसतील व सदर खात्यावरील स्थिती व खाता नं--- वर ७/१२ वरील स्थिती दाखवली जाते .
५. अतिरिक्त अहवाल-१३ (अहवाल-५.१) मधिल गोषवारा पाहिल्या नंतर आपणास आलेल्या गोषव-या प्रमाणे काय करायचे आहे? त्यासाठी हस्तलिखित ७/१२ व ८अ पाहुनच अतिरिक्त अहवाल-५ च्या दुरुस्तीसाठी पुढील पर्याय वापरावे.
६. सर्व प्रथम अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.1 ची दुरुस्ती केव्हा करावी? -
अतिरिक्त अहवाल-१३ (अहवाल-५.१) प्रमाणे जर खातामास्टर वरील सर्व नावे सर्व ७/१२ वर सद्दस्थितील वेगवेगळया फरकाने आहेत परंतु अशी खातामास्टर वरील सर्व नावे सदरच्या खात्यातील सर्व ७/१२ वर एक समान संख्येने पाहिजे असल्यास दुरुस्ती सुविधा क्र २१ अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.1 वापरावा त्यासाठी कोणताही एक सर्व्हे क्र निवडा करुन भाग क्र १ मध्ये सर्व नावे सामविष्ट करुन घ्यावीत व भाग क्र २ मध्ये साठवा करावी (भाग क्र २ साठवा करण्या अगोदर जर आपणास एखादे नाव खात्यामध्ये व त्यातील सर्व सर्व्हे क्रमांकावर नको असल्यास त्या नावाला टीक करुन साठवा करु शकता त्यामुळे टीक केलेले नाव खाता व सर्व ७/१२ वरुन निघुन जाईल)
9. अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - खाता विभागणी पर्याय क्र.2 ची दुरुस्ती केव्हा करावी? –
अतिरिक्त अहवाल-१३ (अहवाल-५.१) प्रमाणे जर खातामास्टर वरील असमान नावे खात्यातील सर्व्हे क्रमांकावर वेगळया खात्याने पाहिजे असल्यास दुरुस्ती सुविधा क्र २२ - पर्याय क्र.2 वापरावा त्यासाठी कोणत्याही नावाला क्लिक केल्यावर असमान नावे सदर खात्यातुन वेगळी होतील व त्यांचे खाते त्या-त्या सर्व्हेवर वेगळे तयार होईल व उर्वरित खात्यातील सर्व सर्व्हे क्रमांकावर नावांची संख्या समान होईल.
10. अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - खाता क्रमांक बदलने पर्याय क्र.3 ची दुरुस्ती केव्हा करावी? –
अतिरिक्त अहवाल-१३ (अहवाल-५.१) प्रमाणे जर खातामास्टर वरील सर्व नावे सर्व ७/१२ वर वेगवेगळया संख्येने आहेत व ती नावे वेगवेगळया संख्येनेच हवी असल्यास दुरुस्ती सुविधा क्र २३ पर्याय क्र.3 वापरावा त्यासाठी सदर खात्यातील समान नावांच्या सर्व सर्व्हे क्रमांकाना निवडा करावे व नविन खाता नंबर व प्रकार द्यावा त्यामुळे समान नावांचे सर्व्हे क्रमांक वेगळे होतील उर्वरित खात्यातील समान नावांचे खाते तेच राहिल.
11. अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - खाता क्र.बदलने.(सर्व्हे क्रमांक निहाय) पर्याय क्र.4 ची दुरुस्ती केव्हा करावी ?-
पर्याय क्र.१, २, ३ वापराताना सदर खात्यामध्ये एक व एकापेक्षा जास्त नावांना कंस असल्यास पर्याय क्र.4 वापरावा. त्यासाठी सर्व्हे क्रमांक निहाय प्रत्येक ७/१२ वरिल कंस असलेल्या खातेदारांना वेगळे करुन घेव्यात व पुन्हा योग्य तो पर्याय वापरुन ७/१२ व खात्यातील नावांची संख्या समान करावी.
अशा पद्धतीने अतिरिक्त अहवाल ५ व ५.१ ची दुरुस्ती करावी . अशी दुरुस्ती झाल्याशिवाय त्या सर्वे न. वर नवीन फेरफार घेता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी .
सदरच्या सुचना सर्व वापरकर्ते यांचे पर्यंत पोहोचवाव्यात हि विनंती .
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत -
उप विभागीय अधिकारी ( सर्व )
तहसीलदार (सर्व )
आपल्या तालुक्यातील सर्व गावातील अतिरिक्त अहवाल ५ निरंक करून घेण्याची कार्यवाही करावी .
Comments