औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार , यवतमाळ व परभणी या सहा जिल्हयांचा SDC वरील डाटा NDC ,पुणे वर स्थानांतरीत केले बाबत -( फक्त ७/१२ व ८ अ देण्यासाठी )
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई
औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार , यवतमाळ व परभणी
विषय - औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार व यवतमाळ या पाच जिल्हयांचा SDC वरील डाटा NDC ,पुणे वर स्थानांतरीत करणेबाबत.
ई-फेरफार प्रकल्प अंमलबजावणी State Data Centre (SDC) मध्ये उपलब्ध असलेले सर्व्हर क्षमता व स्पेसची अंत्यत कमतरता जाणवत असून, त्यामुळे उपलब्ध सर्व्हरवर अतिरिक्त ताण आल्याने, त्यात वेळोवेळी तांत्रीक बिघाड होत आहे. याबाबत दिनांक 05/06/2018 रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे संपुर्ण ई-फेरफार प्रकल्प शासनाच्या Cloud Policy प्रमाणे Government Community Cloud (GCC) वर स्थांनातरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तथापि त्यास काही कालावधी लागणार असल्याने व सद्यस्थितीत SDC कडे या संसाधनाची कमतरता असलेने तात्पुरता उपाय म्हणून नेहमी बंद पडणारे/त्रास देणारे सर्व्हर ( IP 10.187.200.91) या सर्व्हर वरील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार व यवतमाळ जिल्ह्यांचे कामकाज दिनांक २९.६.२०१८ पासून बंद होते . त्यासाठी NDC वर योग्य क्षमतेचे Deta Base Server वर तातडीने उपलब्ध करून देनेत आले आहेत .
या मागील मुख्य उद्देश खातेदारांना पीक कर्ज व पिक विमा करिता गा.न.नं 7/12 व 8 अ सहज उपलब्ध करून देणे आहे. तरी साठी या जिल्ह्यांना NIC चे SISCO VPN अकाऊंट काढावे लागणार आहेत त्यासाठी या जिल्ह्यांकडून वापरकर्त्यांची यादी मागविण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे चालू ई मेल आय डी व वापरत असलेले मोबाईल नंबर देणे आवश्यक असणार आहे. सदरची यादी VPN ACCOUNTS तयार करणेसाठी NIC DELHI कडे पाठविनेत आले आहेत .(CISCO VPN चे CERIFICATE ई मेल वर तर PASSWORD मोबाईल नंबर वर पाठवला जातो . ) तथापि या जिल्ह्यातील प्रत्येक वापरकर्त्यांसाठी SISCO VPN अकाऊंट चे USERNAME व PASSWORD प्राप्त होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे म्हणून आपल्या जिल्ह्याला काह्लील प्रमाणे अन्य जिल्ह्यातील वापरकर्त्यांसाठी तयार SISCO VPN अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपात तातडीच्या कामासाठी वापरण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे DDE व DIO यांचे मेल वर पाठवले आहेत . त्या प्रमाणे मास्टर TRAINERS व DIO यांचे मदतीने VPN ACCOUNTS ACTIVATE करून घ्यावेत . थोड्याच कालावधीत आपले स्वतः चे CISCO VPN ACCOUNTS आल्या नंतर आपला स्वताचा CISCO VPN ACCOUNT वापरून काम करता येईल . हे देनेत येणारे USER NAME / PASSWORD वापरून तलाठी यांनी E-FERFAR मधील OPG सॉफ्टवेअर वापरुन संपूर्ण गावाचा गा.न.नं 7/12 PDF करून OFFLINE ला DOWNLOAD करून ठेवावा. तसेच ई फेरफार मधून ८अ PDF करून घ्यावेत जेणे करून खातेदारांना OFFLINE मध्ये गा.न.नं 7/12 व 8 अ उपलब्ध करून देता येईल.
१. औरंगाबाद -३८
२. नांदेड -५३
३. लातूर - ३१
४. यवतमाळ -३५
५. नंदुरबार - २२
आपल्या जिल्ह्याचा सर्वर NDC वर चालू करण्याची कार्यवाही करणेत आली असून तो मंगळवार दि.१०.७.२०१८ पासून सुरु होईल .या जिल्ह्यांचे महाभूलेख हे संकेत स्थळ देखील सुरु होईल त्यावरून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ७/१२ व ८अ प्राप्त करून घेऊन खातेदारांना उपलब्ध करून देनेत यावेत .
परभणी जिल्ह्याचा DETA नवीन GCC CLOUD सर्वर वर LIVE कामकाजा साठी आज पासून सुरु करून दिला आहे
आपला
रामदास जगताप
दि.९.७.२०१८
Comments