आज पासून औरंगाबाद , नांदेड , लातूर व नंदुरबार व परभणी जिल्हेचा ७/१२ व ८अ महाभूलेख वर सुरु केले बाबत दि. १०.७.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
आज सकाळी ११.०० वाजल्या पासून औरंगाबाद , नांदेड , लातूर व नंदुरबार जिल्हे NDC पुणे स्थित सर्वर वर महाभूलेख संकेतस्थळा साठी सुरु करणेत आले असून परभणी जिल्हा देखील सायंकाळी ४.०० वाजल्या पासून सुरु करणेत आला आहे . आत्ता फक्त यवतमाळ जिल्हा उद्या सकाळी सुरु करणेत येईल . आपल्याला पुरविणेत आलेले CISCO VPN ACCOUNTS सुरु झाले असल्यास प्रत्येक तालुक्यातून ५/६ VPN ACCOUNTS चा वापर करून तातडीचे कामकाज करता येईल . जिल्हाधिकारी परभणी यांनी बोजा नोंदी बाबत काढलेल्या परिपत्रका प्रमाणे मार्गदर्शक सूचना काढल्यास शेतकरी यांना पिक कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत . अशी अपेक्षा आहे .
आपला
रामदास जगताप
दि.१०.७.२०१८
Comments