औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार व यवतमाळ या सहा जिल्हयांचा SDC सर्वर बंद असले बाबत तसेच या जिल्ह्यांचा डाटा NDC वर स्थानांतरीत करणेबाबत
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई
औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार व यवतमाळ
विषय - औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार व यवतमाळ या पाच जिल्हयांचा SDC वरील डाटा NDC वर स्थानांतरीत करणेबाबत.
ई-फेरफार प्रकल्प अंमलबजावणी State Data Centre (SDC) मध्ये उपलब्ध असलेले सर्व्हर क्षमता व स्पेसची अंत्यत कमतरता जाणवत असून, त्यामुळे उपलब्ध सर्व्हरवर अतिरिक्त ताण आल्याने, त्यात वेळोवेळी तांत्रीक बिघाड होत आहे. याबाबत दिनांक 05/06/2018 रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे संपुर्ण ई-फेरफार प्रकल्प शासनाच्या Cloud Policy प्रमाणे Cloud वर स्थांनातरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तथापि त्यास काही कालावधी लागणार असल्याने व सद्यस्थितीत SDC कडे या संसाधनाची कमतरता असलेने तात्पुरता उपाय म्हणून नेहमी बंद पडणारे/त्रास देणारे सर्व्हर ( IP 10.187.200.91) या सर्व्हर वरील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार व यवतमाळ जिल्हयांसाठी ( दिनांक २९.६.२०१८ पासून कामकाज बंद ) योग्य क्षमतेचे Deta Base Server NDC , PUNE वर तातडीने स्थानांतरीत करून वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या मागील मुख्य उद्देश खातेदारांना पीक कर्ज व पिक विमा करिता गा.न.नं 7/12 व 8 अ सहज उपलब्ध करून देणे आहे. तरी साठी या जिल्ह्यांना NIC चे SISCO VPN अकाऊंट काढावे लागणार आहेत त्यासाठी या जिल्ह्यांकडून वापरकर्त्यांची यादी मागविण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे चालू ई मेल आय डी व वापरत असलेले मोबाईल नंबर देणे आवश्यक असणार आहे . CISCO VPN चे CERIFICATE ई मेल वर तर PASSWORD मोबाईल नंबर वर पाठवला जातो . सदरच्या VPN ACCOUNT चे SETTING MANUAL आल्या जिल्ह्याचे DDE व DIO यांना पाठवले जाईल त्या प्रमाणे मास्टर TRAINERS च्या मदतीने VPN ACCOUNTS ACTIVATE करावे लागतील तथापि असे ACCOUNTS तयार होऊन येण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने तो पर्यंत तातडीच्या कामासाठी प्रत्येक तालुक्याला ४/५ तयार असलेले VPN ACCOUNTS दिले जातील ते वापरून कामकाज करता येईल . थोड्या कालावधीत आपले स्वतः चे CISCO VPN ACCOUNTS आल्या नंतर आपला स्वताचा CISCO VPN ACCOUNT वापरून काम करता येईल . हे देनेत येणारे USER NAME / PASSWORD वापरून तलाठी यांनी E-FERFAR मधील OPG सॉफ्टवेअर वापरुन संपूर्ण गावाचा गा.न.नं 7/12 PDF करून OFFLINE ला DOWNLOAD करून ठेवावा. तसेच ई फेरफार मधून ८अ PDF करून घ्यावेत जेणे करून खातेदारांना OFFLINE मध्ये गा.न.नं 7/12 व 8 अ उपलब्ध करून देता येईल.
आपल्या जिल्ह्याचा सर्वर NDC वर चालू करण्याची कार्यवाही येत्या दोन दिवसात करणेत येईल .
सदरची वस्तुस्थिती अधिकारी यांनी जनतेला समजून / विश्वासात घेऊन सांगावी .
परभणी जिल्ह्याचा DETA नवीन GCC CLOUD वर टेस्टिंग झाले त्याच सर्वर वर LIVE कामकाजा साठी लवकरच उपलब्ध करून देनेत येईल
आपला
रामदास जगताप
दि.५.७.२०१८
Comments