रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार प्रणालीमध्ये पाच नवीन सुविधा उपलब्ध करून देणे बाबत

मार्गदर्शक सूचना क्र. ५३ क्र. कक्ष ४ / रा.भू.अ.आ.का./रा.स./ ५३ /२०१८ मा. जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय दिनांक - ३० /०६ /२०१८ . प्रति, जिल्हाधिकारी ( सर्व ) विषय - ई-फेरफार प्रणालीमध्ये पाच नवीन सुविधा उपलब्ध करून देणे बाबत महोदय, ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे प्रणालीत सुधारणा करुन पाच नवीन सुविधा उपलब्ध करून देणेत येत आहेत. १. फेरफार कक्ष बंद करणे (Removal of Role of MCI ):- तहसिल कार्यालयातील फेरफार कक्ष बंद करणेत येत आहे . त्यांचे कडील सर्व फेरफार आता तलाठी लॉगीनला पुढील कार्यवाही साठी उपलब्ध होतील तसेच दररोज दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती देखील थेट संबंधीत तलाठी यांचे लॉगीनला उपलब्ध होईल. त्यावर पुढील प्रक्रिया तलाठी स्थरावर करून फेरफार तयार करणे व नोटीस तयार करणे ही कार्यवाही करता येईल . २. फिफो तत्वाची अंमलबजावणी (FIFO- First Come First Out Principle ) :- या पुढे तलाठी स्थरावर प्रथम नोंदणी झालेल्या दस्त क्रमांकाचा फेरफार प्रथम तयार केल्याशिवाय (अनुक्रमे) अन्य दस्तांचे फेरफार तयार करुन पुढील कार्यवाही करता येणार नाही. ३. कलम 155 च्या आदेशाने मंजूर फेरफारातील तपशील / मंडळ अधिकारी यांचा शेरा दुरुस्त करणे ची सुविधा :- काही तांत्रिक कारणांमुळे अथवा अपुर्ण प्रशिक्षणामुळे जुन्या मंजुर फेरफारापैकी काही फेरफारांचा तपशिल अपुर्ण/अर्धवट अथवा चुकीचा तयार झाला असल्यास अथवा मंडळ अधिकारी शेरा देखील चुकीचा साठवला गेला असुनही या फेरफारामध्ये समाविष्ठ स.नं. वर फेरफाराचा योग्य अंमल झाला असल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155च्या आदेशाने फेरफार तपशील व मंडळ अधिकारी शेरा दुरुस्त करता येईल यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार यांनी काम करणे आवश्यक आहे. ४. SKN-TKN दुरुस्ती सुविधा :- दुय्यम निबंधक कार्यालयातुन काही चुकीची डाटा एंट्री झाल्याने अथवा चुकीचे SKN, TKN तयार केले असतील, तर अशा प्रकरणी फेरफाराचा योग्य अंमल होऊ शकणार नाही अशा सर्व प्रकरणी Compulsory SKN, TKN दुरुस्ती तलाठी स्तरावर करण्याची सुविधा देणेत आली आहे. त्यानंतरच अश्या फेरफारावर पुढील प्रक्रिया करून या फेरफाराचा योग्य अंमल 7/12 वर होऊ शकतो. ५. खाते क्रमांक अनुक्रमाने लावणे ( Re-arraging Khata No) : - ज्या गावात Jumping खाते क्रमांक पडलेले आहेत त्या गावात फेरफार प्रलंबित असलेली खाती वगळता इतर सर्व खात्यांचे क्रमांक अनुक्रमाकांने लावण्याची सुविधा देण्यात आली आहे. या पाचही सुविधांचे User Manual ही सोबत पाठवित आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करणे बाबत सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांना सूचना द्याव्यात ही विनंती . आपला विश्वासू ( रामदास जगताप ) उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे. प्रत – मा. अप्पर मुख्य सचिव , महसूल , नोंदणी व मुद्रांक शुल्क , महसूल व वन विभाग , मंत्रालय , मुंबई . प्रत , उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई (सर्व) वरील मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात

Comments

  1. मी श्री मोतीराम पांडु हडपे रा. देवळी चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र पिन ४२४११६ मो. ९८५०७९५०५८ मी दि१५/०२/२१ वारस नोदंणी अर्ज ऑनलाईन केला व एकुकमे कमी करणे बाबत तलाठी कडे ऑनलाईन अर्ज केला त्या प्रमाणे फेराफार नोंदी तयार करूण दि१५/०३/२१ व दि.२३/०३/२१ असे फेराफार तयार आहेत फेराफार नबंर ५११५,५१२७,५१२८असे आहेत परंतु आजून हे फेराफार क्रमाक खाते ऊतारावर व ७/१२ वर नोदंणी केल्याचे दिसत नाही. तसा १५ दिवसाचा कलावधी संपला परंतु अडचण काय आहे गांव तलाठी डोणदिगर ता चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र हे सबब ही सांगात नाहीत व नोदंणी ही करत नाहीत यांची चौकशी करावी ांांांाांांांांांांाांांांांाांांांांांांाांांांाांांांांांांाांांांांाांांांांांांांांांाांांांांांांाांांांांाांांांांांांाांांांाांांांांांांाांांांांाांांांांांा

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send