रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या सहा जिल्हयांचा SDC वरील डाटा NDC ,पुणे वर स्थानांतरीत झाल्याने NDC वर कामकाज सुरु करणे बाबत

नमस्कार मित्रांनो , प्रति, उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार , यवतमाळ व परभणी विषय - औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या सहा जिल्हयांचा SDC वरील डाटा NDC ,पुणे वर स्थानांतरीत झाल्याने NDC वर कामकाज सुरु करणे बाबत ई-फेरफार प्रकल्प अंमलबजावणी State Data Centre (SDC) मध्ये उपलब्ध असलेले सर्व्हर क्षमता व स्पेसची अंत्यत कमतरता निर्माण झाल्याने व उपलब्ध सर्व्हरवर अतिरिक्त ताण आल्याने, आपल्या सर्वर मध्ये वेळोवेळी तांत्रीक बिघाड होते . सद्यस्थितीत SDC कडे या संसाधनाची कमतरता असलेने तात्पुरता उपाय म्हणून नेहमी बंद पडणारे/त्रास देणारे सर्व्हर ( IP 10.187.200.91) या सर्व्हर वरील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, नंदुरबार व यवतमाळ जिल्ह्यांचे कामकाज दिनांक २९.६.२०१८ पासून बंद होते . त्यासाठी NDC वर योग्य क्षमतेचे Deta Base Server वर तातडीने उपलब्ध करून देनेत आले आहेत . या मागील मुख्य उद्देश खातेदारांना पीक कर्ज व पिक विमा करिता गा.न.नं 7/12 व 8 अ सहज उपलब्ध करून देणे आहे. तरी साठी या जिल्ह्यांना NIC चे SISCO VPN अकाऊंट काढावे लागणार आहेत त्यासाठी या जिल्ह्यांकडून मागवलेली वापरकर्त्यांची यादी NIC DELHI यांचे कडे पाठविनेत आली आहे .(CISCO VPN चे CERIFICATE ई मेल वर तर PASSWORD मोबाईल नंबर वर पाठवला जातो . ) तथापि या जिल्ह्यातील प्रत्येक वापरकर्त्यांसाठी SISCO VPN अकाऊंट चे USERNAME व PASSWORD प्राप्त होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे म्हणून आपल्या जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला ६ या प्रमाणे अन्य जिल्ह्यातील वापरकर्त्यांसाठी तयार केलेले SISCO VPN अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपात तातडीच्या कामासाठी वापरण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे DDE व DIO यांचे मेल वर पाठवले आहेत . त्या प्रमाणे मास्टर TRAINERS व DIO यांचे मदतीने VPN ACCOUNTS ACTIVATE करून घेतले असतील . (थोड्याच कालावधीत आपले स्वतः चे CISCO VPN ACCOUNTS आल्या नंतर आपला स्वताचा CISCO VPN ACCOUNT वापरून काम करता येईल ) DDE यांचे कडून ५/६ VPN ACCOUNTS प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना वाटप केले असतील ( तसे वाटप केले नसल्यास वाटप करावेत ) या VPN ACCOUNTS चे USER NAME / PASSWORD वापरून तहसीलदार / DBA यांनी E-FERFAR मधील OPG MODULE वापरुन संपूर्ण गावाचा गा.न.नं 7/12 व ८अ PDF करून OFFLINE ला DOWNLOAD करून संबंधित तलाठी यांना त्यांचे LAPTOP वर COPY करून द्यावा . म्हणजे त्याचे आधारे तलाठी यांना जनतेला ७/१२ व ८अ देता येतील . १. औरंगाबाद -३८ २. नांदेड -५३ ३. लातूर - ३१ ४. यवतमाळ -३५ ५. नंदुरबार - २२ ६. परभणी जिल्ह्यासाठी VPN ACCOUNTS उद्या देनेत येतील आपल्या जिल्ह्याचा सर्वर NDC वर चालू करण्याची कार्यवाही करणेत आली असून तो मंगळवार दि.१०.७.२०१८ पासून सुरु केला आहे . या जिल्ह्यांचे महाभूलेख हे संकेत स्थळ देखील सुरु होईल त्यावरून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ७/१२ व ८अ प्राप्त करून घेऊन खातेदारांना उपलब्ध करून देनेत यावेत . परभणी जिल्ह्याचा DATA नवीन GCC CLOUD सर्वर वर फक्त ७/१२ ,८अ व फेरफार साठी सुरु करून दिला आहे तसेच OPG / MUTATION साठी NDC पुणे वर सुरु केला आहे . आपला रामदास जगताप दि.११.७.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send