फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला नाही या साठी कार्यपद्धती
नमस्कार मित्रांनो ,
फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला नाही या साठी USER MANUAL
मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित केल्या नंतर त्याचा ७/१२ वर योग्य अंमल झाला कि नाही हे पाहून एक REMARK देणे आवश्यक आहे
फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला किंवा
फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला नाही
जेंव्हा मंडळ अधिकारी REMARK देतो : फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला, त्या वेळी ह्या फेरफाराची कार्यवाही येथेच संपते
परंतु जेंव्हा मंडळ अधिकारी फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला नाही, असा REMARK देतो तेंव्हा काय करायचे ते पहा . ( तलाठी स्थरावर DATA ENTRY करताना झालेल्या चुका मुले .)
जसे ,
सामान्य फेरफार प्रकार मध्ये तलाठी खरेदी देणारा ला कंस करायला विसरला असेल अथवा ईतर हक्कातील दुरुस्ती केली नसेल अथवा खरेदी देणाराचे क्षेत्र कमी करायला विसरला असेल किंवा खारेदिदारचे नवा समोर क्षेत्र टाकायला विसरला असेल .
समाईक खात्यातील खरेदी देणार व घेणार असतील तेंव्हा खरेदी देणाराचे नाव सामाविस्त होत नसून फक्त चाचे क्षेत्र वाढविले जाते किंवा खातेदाराची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिली जाऊ शकतात त्यावेळी फेरफार मंजूर होऊन देखील योग्य अंमल होत नाही
त्यावेळी हि सुविधा वापरावी
Tयासाठी कार्यपद्धती अत्यंत सोपी आहे
स्टेप १.मंडळ अधिकारी यांनी फेरफार योग्य रित्या प्रमाणित झाला नाही असा REMARK देऊन निश्चित कोणत्या ठिकाणी काय अंमल चुकत आहे ते नमूद करावा
स्टेप २.तलाठी यांना हे सर्वे नं “फेरफाराचा अंमल ७/१२ वर न झालेल्या सर्वे क्रमांकाची दुरुस्ती’ या पर्यायामध्ये तलाठी लॉगीन ला दिसतील त्यामध्ये मंडळ अधिकारी यांचा काय अंमल चुकत आहे त्या बाबतचा रेमार्क दिखील दिसेल
तलाठ्याने फेरफार क्रमांक निवडताच त्यामधील सर्वे नं देखील मंडळ अधिकार्याच्या REMARK सह दिसतील
त्या नंतर स.न. निवडून आवश्यक त्या दुरुस्त्या तलाठ्याला करता येतील ( जसे भोगावातादाराची माहिती , ईतर अधिकार , हिस्ट्री फेरफार इत्यादी )
आवश्यातेप्रमाणे दुरुस्त्या करून तलाठी सातबारा चे पूर्वावलोकन पाहिलं ते योग्य असल्यास ‘काम संपल्याची घोषणा’ करील
स्टेप ३. मंडळ अधिकारी तलाठ्याने केलेले बदल पाहिलं व पुन्हा फेरफार प्रमाणित करून योग्य रित्या अंमल झाला असा REMARK देईल .
ही प्रक्रिया सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी समजून घ्यावी व कार्यवाही करावी
आपला
रामदास जगताप
दि २२.७.२०१८
Comments