ई फेरफार साठी काही महत्वाच्या सुचना दि.२२.७.२०१८
नमस्कार मित्रानो ,
आज रविवार सुट्टीचा दिवस असताना ई फेरफार साठी काही महत्वाच्या सूचना आपल्या माहिती साठी देत आहे
ई फेरफार प्रणाली डेटा मधील त्रुटी मुळे जरा जास्तच COMPLICATED झाली आहे तथापि आपल्या दप्तरातील नेमकी त्रुटी समजीन त्या प्रमाणे त्रुटी दुरुस्त्या करणे आवश्यक आहे . काम स्वतः तलाठी व मंडळ अधिकारी यांनी समजून घेऊन केल्यास ही प्रणाली आपल्याला सुसह्य वाटेल असा मला विस्वास आहे
१. कलम १५५ च्या आदेशाने दिलेल्या सर्व सुविधा
अ. खात्यात दुरुस्ती
ब. फेरफार क्रमांक दुरुस्ती
क. इतर हक्कातील प्रकार व उप प्रकार दुरुस्ती
ड. भूधारणा पद्धती पद्धती दुरुस्ती
इ. अह्वाल १ ची दुरुस्ती
फ. फेरफार रजिस्टर दुरुस्ती
ग. नवीन ७/१२ तयार करणे
या सर्व दुरुस्त्यांना तहसीलदार यांची मान्यता व आदेश आवश्यक आहे
२. घोषणापत्र ३ झाल्या नंतर प्रख्यापण आदेश काढल्या नंतर सर्व अहवाल ई फेरफार साठी आवश्यक केले आहेत ( अहवाल १ व ३ सुद्धा)
३. नव्याने दिलेल्या अहवाल अतिरिक्त ५ च्या दुरुस्ती सुविधा विचारपूर्वक व USER MANUAL पाहून वापरणे आवश्यक आहे
४. री एडिट काम करत असताना समान नावाची दोन व्यक्ती असल्यास
अ .त्यांची खाती वेगवेगळी असल्यास त्यापैकी प्रत्येक खात्यात असणारे आडनाव च्या पुढे टोपण नाव या सदरी टोपण नाव नमूद करणे आवश्यक होते .
अशी दोन व्यक्ती आहेत असे लक्षात न आल्यास अशा खात्याचे एकत्रीकरण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही
ब.अशा दोन भिन्न व्यक्तीची खाती यापूर्वीच एकत्र झालेली असल्यास ते खाते संबंधित गटावरून वगळून संबंधित गटावर टोपण नाव नमूद केलेले खाते समाविष्ट करणे आवश्यक होते
कामकाज करत असताना यापूर्वीच अशी खाती एकत्र झालेली असल्यास ही बाब चुकून राहून गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही
वर वर सोपी वाटणारी ही बाब कामकाज करत असताना फारच अडचणीची आहे .नजर चुकीने एकत्र झालेल्या खात्याची चुकून वारस नोंद झाली तर अनावश्यक गटावर व जिवंत
व्यक्तीला वारस लागतात किंवा नोंद घेतल्यावर असे लक्षात आले तर ती नोंद नामंजूर करावी लागते .त्या व्यक्तीने धारण केलेले क्षेत्र जास्त दिसत असल्याने त्यास हव्या त्या सवलती मिळू शकत नाही .
एखाद्या व्यक्ती गैरफायदा घेऊन ते क्षेत्र परस्पर विकण्याची शक्यता नाकारता येणार नाही
५.मा जमाबंदी आयुक्त पुणे यांनी त्यांच्याकडील 19 जून 2018 च्या परिपत्रकानुसार री एडिट कामकाज दुरुस्त
करून घेण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे या परिपत्रकाचा फायदा घेऊन
समान नावाची एकत्र झालेली खाती शोधून दोन्ही व्यक्ती कडून आधार कार्ड मतदान कार्ड इ आनुषंगिक पुरावा घेऊन व काय टोपण नाव नमूद करायचे हे लेखी घेऊन असे अर्ज 155 साठी सादर करता येईल
६. मयताचे नाव कमी करणे आणि वारस -- ज्या सातबारावर या अगोदरच पूर्वीच्या नोंदी ने वारस दाखल झाले आहेत व नंतर यापैकी एक व्यक्ती मयत होऊन त्यांना तेच वारस आहेत
व ते वारस दाखल असलेने असे वारसांची वारस नोंद घेत असताना मयताचे नाव कमी करणे मधून घेणेची आहे .मात्र बऱ्याच वेळा ही नोंद वारस template मध्ये घेतली जाते.
अशा वेळी मयत व्यक्तीने धारण केलेले user num च्या समोर क्षेत्र define असेल तर असा गट मंजुरीच्या वेळी अहवाल 1 मध्ये जातो .
वारस नोंद re entry बंद असलेने अशी नोंद नामंजूर करण्याशिवाय पर्याय उरत नाही .
यास्तव अशा नोंदी मयताचे नाव कमी करणे या प्रकारातून घेतल्या तर असा एरर तयार होत नाही .त्यामुळे अशा केस मध्ये मयताचे नाव कमी करणे हा पर्याय वापरणे उपयुक्त आहे .
६. नवीन ७/१२ तयार करणे साठी कलम १५५ प्रमाणे दिलेली सुविधा वापर फक्त त्यामध्ये ( फेरफार तपशील मध्ये योग्य आदेशाची शब्द रचना करावी )
७.एखाद्या ७/१२ वरील एका खात्यावर फेरफार नोंद प्रलंबित असताना त्याच ७/१२ वरील दुसर्या खात्यावर फक्त TEMPLATE मधून फेरफार नोंद घेता येते त्यासाठी सामान्य फेरफार प्रकार वापरू नये .
८. ई फेरफार TEMPLATE मध्ये न बसणारा एखादा फेरफार घ्यायचा असल्यास आदेश व दस्त ऐवज मधून तहसीलदार अथवा अन्य कोणत्याही अधिकारी यांचे आदेशाने घेता येईल मात्र फेरफार तपशील पूर्ण TYPE करावा लागतो
९. अहवाल १ च्या दुरुस्ती करणे साठी काही ठिकाणी दोन फेरफार घ्यावे लागतात
१०. दुय्यम निबंधक कार्यालयात होणार्या अविभाज्य हिस्स्याच्या विक्री साठी नवीन सुविधा व फेरफार TEMPLATE विकाशित केले असून ते UAT साठी काही जिल्ह्यांना दिले आहे
आपला
रामदास जगताप
दि.२२.७.२०१८
Comments