तहसिल कार्यालयातील फेरफार कक्ष बंद करून नोंदणीकृत दस्ताची माहिती तलाठी लॉगीनला उपलब्ध करून देणेबाबत.
मार्गदर्शक सुचना क्रं. 56 क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स/ 56/2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक 20/07/2017
प्रति,
मा. जिल्हाधिकारी, (सर्व)
(DILRMP-कक्ष)
विषय- तहसिल कार्यालयातील फेरफार कक्ष बंद करून नोंदणीकृत दस्ताची
माहिती तलाठी लॉगीनला उपलब्ध करून देणेबाबत.
ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त होणाऱ्या नोंदणीकृत दस्तांची माहितीवर प्रक्रिया करून फेरफार तयार करण्यासाठी व फेरफाराची नोटिस (नमुना-9) तयार करून हित संबधितांना बजावण्याच्या उद्देशाने तहसिलदार कार्यालयात फेरफार कक्ष तयार करून तेथे एक अव्वल कारकून व दोन तलाठी संर्वगातील कर्मचारी यांची नेमणूक करून त्यांनी फेरफार कक्ष प्रभारी म्हणून काम करण्याचे निर्देश शासनारचे पत्र क्रं. संकीर्ण 2013/प्र.क्रं.220/ल-1 दिनांक 04/07/2013 अन्वये देण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यवाही ऑनलाईन ई-फेरफार प्रणाली द्वारे केली जात होती. तथापि म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 150(2) मध्ये केलेला बदल व व्यवसाय सुगमना (Ease of Doing Bussiness) साध्य करण्यासाठी हा टप्पा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1 जुलै 2018 पासून हा फेरफार कक्ष बंद करण्यात आलेला आहे, हयाची नोंद घ्यावी. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्राप्त नोंदणीकृत दस्तांची माहिती संबधित तलाठी यांचे लॉगीनला थेट प्राप्त होईल त्यावर संबधित तलाठी यांनी योग्य ती कार्यवाही करून फेरफार घेण्याची प्रक्रिया करावी. त्याबाबतचे युजर मॅन्युअल सोबत जोडले आहे.
आपला विश्वासू
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय , , पुणे
Comments