रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार प्रणालीतील वापरकर्त्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.

ई-फेरफार/ 57 क्र/रा.स./कावि/57/२०१8 जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय दिनांक २०/७/२०१८ . प्रति, जिल्हाधिकारी (सर्व) ( DILRMP कक्ष ) विषय :- ई-फेरफार प्रणालीतील वापरकर्त्यांची माहिती अद्यावत करणेबाबत. संदर्भ :- या कार्यालयाचे परिपत्र क्र.रा.भू.अ.आ.का.4/प्र.क्र.24/2013 दिनांक 25/7/2013. महोदय, ई-महाभूमी प्रकल्प अंतर्गत कार्यान्वित असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये नोंदणी केलेल्या उप आयुक्त (महसूल), उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. तहसिलदार, नायब तहसिलदार, व फेरफार कक्ष प्रभारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांची नोंदणी User creation Module मधुन केली जाते. तथापि त्यामध्ये यापुर्वी नोंदणी केलेल्या अधिकारी , कर्मचारी यांची माहिती व स्टेटस योग्य रित्या अद्यावत नसलेने प्रणालीच्या योग्य वापरामध्ये काही एरर / अडथळे येतात त्यासाठी खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. त्याप्रमाणे डी.डी.ई. यांनी कार्यवाही करावी. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर यांची नेमणुक व कर्तव्ये संदर्भीय परिपत्रकान्वये निश्चित करुन दिलेली आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करणेही त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. 1. फेरफार कक्ष बंद केला असेलेने सर्व फेरफार कक्ष प्रभारी यांचे लॉगीन बंद करणेत आले त्यामुळे स्थिती बदला या पर्यायामधुन त्यांचे स्टेटस बदलावे. 2. ज्या तलाठी यांना गांवे वाटप (Assign) केलेली नाहीत त्यांना पदोन्नती/बदली/अर्जित रजा/ निलंबित/सेवानिवृत्त यापैकी एक योग्य स्टेटस देण्यात यावे व सर्व तलाठी यांचे सेवार्थ आय डी पगार पत्रकाप्रमाणे तसेच मोबाईल नंबर योग्य असल्याची खात्री करावी. 3. ज्या मंडळ अधिकाऱ्यांना गांवे वाटप (Assign) केलेली नाहीत त्यांना देखील पदोन्नती/बदली/अर्जित रजा/सेवानिवृत्त / अन्य कारणे यापैकी एक योग्य स्टेटस देण्यात यावे व सर्व मंडळ अधिकारी यांचे सेवार्थ आय डी पगार पत्रकाप्रमाणे तसेच मोबाईल नंबर योग्य असल्याची खात्री करावी. ई-फेरफार प्रणालीत डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर (DBA) यांची महत्वाची भूमिका असून आपल्या प्रणालीमध्ये कोणतीही अयोग्य व्यक्ती ( सेवानिवृत्त/निलंबित/ऑपरेटर ) काम करीत नाही ते पाहणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पदभार हस्तांतरीत करतांना गावांचे वाटप करताना (Assign) किंवा सेवानिवृत्ती /बदली यांच्या नोंदी घेताना सक्षम अधिकारी यांचे लेखी आदेश असल्याशिवाय वापरकर्त्यांच्या जबाबदारीत ऑनलाईन बदल ( User Creation) मधुन करु नये. आपल्या तालुक्यातील सर्व तलाठी /मंडळ अधिकारी यांचे बदली / सेवानिवृत्तीची आदेश संचिका व नोंदवही तालुका स्तरावर अद्यावत ठेवण्याची जबाबदारी डी.बी.ए. यांची आहे याची नोंद घ्यावी. वरीलप्रमाणे कार्यवाही डी.बी.ए./नायब तहसिलदार यांनी करुन सोबतच्या नमुन्यातील प्रमाणपत्र डी.डी.ई. यांना सादर करावे व डि.डि.ई. यांनी एकत्रित प्रमाणपत्र जमाबंदी आयुक्त व विभागीय आयुक्त या कार्यालयांकडे 8 दिवसात सादर करावे. आपला विश्वासू, ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.

Comments

Archive

Contact Form

Send