रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पिक विमा व पिक कर्जासाठी खातेदारांना सातबारा व खातेउतारा उपलब्ध करून देणे बाबत

नमस्कार मित्रांनो , विषय -पिक विमा व पिक कर्जासाठी खातेदारांना सातबारा व खातेउतारा उपलब्ध करून देणे बाबत आपल्या सर्वांना माहित आहेच की , SDC वरील सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड झालेने निर्माण झालेल्या अडचणीवर मात करणेसाठी SDC वरील सहा जिल्हे NDC पुणे येथे तात्पुरते सर्वर उपलब्ध करून देऊन स्थलांतरीत करणेत आले आहेत तर पाच जिल्हे BSNL CLOUD वर स्थानांतरीत करणेत आले आहेत . सर्व जिल्ह्यांना ई फेरफार सह सर्व MODULE पूर्ववत उपलब्ध करून दिले आहेत तसेच OFFLINE पद्धतीने देखील वितरणासाठी PDF ७/१२ उपलब्ध व्हावेत म्हणून OPG मध्ये संपूर्ण गावचे , ५०/५० च्या ग्रुप मध्ये तसेच सर्व्हे नंबर निहाय सातबारा PDF करणेची सुविधा देनेत आलेली आहे . SDC वरील सहा जिल्ह्याना NICNET अथवा MSWAN नेटवर्क मध्ये VPN ACCOUNT शिवाय काम करता येईल अन्यथा CISCO VPN ACCOUNT वापरूनच काम करावे लागेल . BSNL CLOUD आठ जिल्ह्यांना व SDC वरील उर्वरीत जिल्ह्यांना FORTINET VPN ACCOUNT वापरून काम करता येईल . सर्व जिल्ह्यांचे महाभूलेख संकेतस्थळ देखील सुरु करणेत आले आहे व त्यावरून ७/१२ च्या प्रिंट काढून देखील तलाठी स्वाक्षरीत करून नक्कल म्हणून वितरीत करू शकतो . तसेच आज अखेर डिजिटल स्वाक्षरीत झालेले ७/१२ देखील जनतेला mahabhumi या संकेतस्थळावर उपलब्ध करून देनेत आले आहेत . सध्या पिक विमा व पिककर्ज घेण्यासाठी शेतकरी यांना मोठ्याप्रमाणात ७/१२ व ८अ ची गरज भासते यासाठी आपले जिल्ह्यातील सर्व तलाठी यांना ई फेरफार प्रणालीतून आठवा OPG MODULE मधून PDF ७/१२ व HTML ८अ डाउनलोड करून हस्तलिखित स्वाक्षरीने वितरीत करावेत . अत्यावश्यक कामासाठी सातबारा व ८ अ मिळत नाही अशी तक्रार येणार नाही ह्याची दक्षता DDE / SDO / तहसीलदार यांनी घ्यावी . आपला रामदास जगताप दि.१८/७/२०१८

Comments

Archive

Contact Form

Send