औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या जिल्ह्यात ई फेरफार सुविधा सुरु झाले बाबत
नमस्कार मित्रांनो ,
आपल्या सर्वांना माहित आहेच की , दिनांक २९ जून २०१८ दु. ३.३० वा पासून ई फेरफार बंद झालेल्या औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या जिल्ह्यासाठी NDC वर सुरु केलेल्या सर्वर वर आज संध्याकाळ पासून ई फेरफार सुविधा सुरु करणेत आली आहे .
या जिल्ह्यांना NDC पुणे येथे तात्पुरते सर्वर उपलब्ध करून देऊन या जिल्ह्यातील खातेदाराना ७/१२ व ८अ उपलब्ध करून देणे साठी खालील उपाययोजना केल्या होत्या त्यांचा योग्य वापर करून लातूर सारख्या जिल्ह्याने ९०% गावांचे PDF ७/१२ डाउनलोड करून जनतेला उपलब्ध करून देणे सुरु केले आहे
१. या सर्व जिल्ह्यांना प्रत्येक तालुक्यासाठी ५/६ CISCO VPN ACCOUNT उपलब्ध करून दिले आहेत तसेच या सर्व जिल्ह्यासाठी OPG मध्ये PDF ७.१२ व HTML ८अ एकाचवेळी तयार करून तलाठ्याच्या LAPTOP वर उपलब्ध करून देता येतील अशी सोय केली आहे .
२. या सर्व जिल्ह्यांचे महाभूलेख संकेस्थळ सुरु करणेत आले आहे व या संकेतस्थळावर उपलब्ध ७/१२ वरील सूचना बदलून या सातबारा वर संबंधित तलाठी / नायब तहसीलदार यांची सही व शिक्का असल्यास सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी वैध अशी सूचना छापण्यात आली आहे
३. या जिल्ह्यांचे आपले सरकार संकेतस्थळावरील सातबारा सुरु करणेत आले आहेत
४. बँकांनी ७/१२ वर कर्ज बोजाची नोंद नसली तरी कर्ज बोजाचा अर्ज तलाठी कार्यालयात सुपूर्द केलेची पोहोच सादर केल्यास कर्जाची रक्कम वितरीत करावी अशा अर्थाचे परभणी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे अन्य जिल्ह्यात देखील कार्यवाही करावी .
५. आता तातडीच्या फेरफार नोंदी देखिल आपल्याला घेता येतील
VPN ACCOUNT साठी पाठविलेल्या माहिती मध्ये अनेक तालुक्यातील / जिल्ह्याने पाठविलेल्या माहिती मध्ये सेवार्थ आई डी / मोबाईल नंबर आथवा ई मेल आय डी चुकीचे मिळून आलेने आपल्या सर्वांचे VPN ACCOUNT मिळण्यास विलंब होत आहे .
ई मिळकत पत्रिकेसाठी भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचार्यांसाठी देखील VPN ACCOUNT काधानेत आले आहेत . संबंधित DDE यांनी संबंधित अधीक्षक भूमी अभिलेख ( SLR) यांचे कडून VPN ACCOUNT ACTIVATE करून त्याचे CERTIFICATE व PASSWORD घेयून काही कालावधी साठी वापर्नेस मा जमाबंदी आयुक्त साहेब यांनी मान्यता दिलेली आहे त्यासाठी DDE यांनी योग्य समन्वय करावा अशी अपेक्षा आहे
उद्या सकाळ पर्यंत सर्व गावचे ७/१२ व ८ अ डाउनलोड करून सबंधित जिल्ह्याचे dde यांनी प्रेस नोट देऊन जिल्ह्यातील सर्व तलाठी DBA यांचेकडे ७/१२ व ८ अ च्याप्रती उपलब्ध असलेचे जाहीर करावे व उद्या पासून सर्व खातेदार यांना ७/१२ व ८ अ विना अडथळा उपलब्ध होतील ह्याची दक्षता घ्यावी .
NDC वरील सर्वर ची क्षमता देखील वाढवली असलेने या सर्व जिल्ह्यातील तालुक्यांना महाभूलेख संकेतस्थळावर देखील ७/१२ व ८ अ तत्काळ उपलब्ध होईल .
तांत्रिक कारणाने आपल्या सर्वांना व जनतेला झालेल्या त्रासा बद्दल ...........
आपला
रामदास जगताप
दि.१६.७.२०१८
धन्यवाद सर....
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteआदरणीय सर जर एखाद्या नोकरदाराने शेतजमीन खरेदी केली असेल व नंतर खरेदी दिल्यास भुमिहीन होत असेल तर खरेदी देता येते का? जर अशी शेतजमीन एखाद्या व्यक्तीने खरेदी केली असेल तर फेरफार नोंदणीस आडचन येते का अथवा फेरफार नामंजूर केला जाऊ शकतो का?
ReplyDeleteमा आदरणीय सर आपण सात बारा व 8 अ उपलब्ध करून दिल्याबद्ध धन्यवाद सर जसे सात बारा pdf मध्ये उपलब्ध करून दिले आहेत तसेच गावचे स्वतंत्र व संपूर्ण फेरफार रजिस्टर pdf मध्ये दिले तर खुप छान होईल म्हणजे शेतकऱ्याची गैर सोय होणार नाही व खातेदार यादी क्षेत्रा नुसार व आकार नुसार एक्सल मध्ये देण्यात यावे म्हणजे संपूर्ण गावचे डिमांड व खातेदार यादी काढायला सोपे जाईल
ReplyDeleteसर एखाद्या प्रॉपर्टी मधील भागीदार बदल करावयाचा आहे म्हणजे जुने भागीदार काढून त्यात नवीन भागीदार समाविष्ट करावयाचे आहे तर ते करता येते का?
ReplyDeleteजर करता येत असेल तर फेरफार घेताना त्याची नोंद हि कोणत्या प्रकारात घ्यावी याबद्दल मार्गदर्शन हवे आहे.
तरी मा.साहेबांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.