औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या जिल्ह्यातील खातेदारांना ७/१२ व ८ अ उपलब्ध करून देणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
आपल्या सर्वांना माहित आहेच की , औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या जिल्ह्याचा SDC वरील सर्वर बंद पडल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीवर करण्यासाठी
या जिल्ह्यांना NDC पुणे येथे तात्पुरते सर्वर उपलब्ध करून देऊन या जिल्ह्यातील खातेदाराना ७/१२ व ८अ उपलब्ध करून देणे साठी खालील उपाययोजना केल्या आहेत
१. या सर्व जिल्ह्यांना प्रत्येक तालुक्यासाठी ५/६ CISCO VPN ACCOUNT उपलब्ध करून दिले आहेत तसेच या सर्व जिल्ह्यासाठी OPG मध्ये PDF ७.१२ व HTML ८अ एकाचवेळी तयार करून तलाठ्याच्या LAPTOP वर उपलब्ध करून देता येतील अशी सोय केली आहे .
२. या सर्व जिल्ह्यांचे महाभूलेख संकेस्थळ सुरु करणेत आले आहे व या संकेतस्थळावर उपलब्ध ७/१२ वरील सूचना बदलून या सातबारा वर संबंधित तलाठी / नायब तहसीलदार यांची सही व शिक्का असल्यास सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी वैध अशी सूचना छापण्यात आली आहे
३. या जिल्ह्यांचे आपले सरकार संकेतस्थळावरील सातबारा सुरु करणेत आले आहेत
४. बँकांनी ७/१२ वर कर्ज बोजाची नोंद नसली तरी कर्ज बोजाचा अर्ज तलाठी कार्यालयात सुपूर्द केलेची पोहोच सादर केल्यास कर्जाची रक्कम वितरीत करावी अशा अर्थाचे परभणी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे अन्य जिल्ह्यात देखील कार्यवाही करावी .
५. आज सुट्टी असूनही या पाचही जिल्ह्यात ७/१२ व ८ अ डाउनलोड करणेचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे त्या पैकी काही ठिकाणी काही ७/१२ blank डाउनलोड झाले असलेचे दिसून येते त्या गावात पुन्हा ७/१२ व ८ अ डाउनलोड करावेत .
उद्या संध्याकाळ पर्यंत सर्व गावचे ७/१२ व ८ अ डाउनलोड करून सबंधित जिल्ह्याचे dde यांनी प्रेस नोट देऊन जिल्ह्यातील सर्व तलाठी DBA यांचेकडे ७/१२ व ८ अ च्याप्रती उपलब्ध असलेचे जाहीर करावे व सोमवार पासून सर्व खातेदार यांना ७/१२ व ८ अ विना अदथळा उपलब्ध होतील ह्याची दक्षता घ्यावी .
( या सर्व जिल्ह्यातील तालुक्यांना महाभूलेख संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत )
ही विनंती
आपला
रामदास जगताप
दि.१३.७.२०१८
Comments