रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या सहा जिल्हयांतील खातेदाराना ७/१२ व ८अ उपलब्ध करून देणे बाबत

नमस्कार मित्रांनो , आपल्या सर्वांना माहित आहेच की , औरंगाबाद, नांदेड, लातूर, नंदुरबार,परभणी व यवतमाळ या जिल्ह्याचा SDC वरील सर्वर बंद पडल्यामुळे निर्माण झालेल्या अद्चानेवर मात करण्यासाठी या जिल्ह्यांना NDC पुणे येथे तात्पुरते सर्वर उपलब्ध करून देऊन या जिल्ह्यातील खातेदाराना ७/१२ व ८अ उपलब्ध करून देणे साठी खालील उपाययोजना केल्या आहेत १. या सर्व जिल्ह्यांना प्रत्येक तालुक्यासाठी ५/६ CISCO VPN ACCOUNT उपलब्ध करून दिले आहेत तसेच या सर्व जिल्ह्यासाठी OPG मध्ये PDF ७.१२ व HTML ८अ एकाचवेळी तयार करून तलाठ्याच्या LAPTOP वर उपलब्ध करून देता येतील अशी सोय केली आहे . २. या सर्व जिल्ह्यांचे महाभूलेख संकेस्थळ सुरु करणेत आले आहे व या संकेतस्थळावर उपलब्ध ७/१२ वरील सूचना बदलून या सातबारा वर संबंधित तलाठी / नायब तहसीलदार यांची सही व शिक्का असल्यास सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी वैध अशी सूचना छापण्यात आली आहे ३. या जिल्ह्यांचे आपले सरकार संकेतस्थळावरील सातबारा सुरु करणेत आले आहेत ४. बँकांनी ७/१२ वर कर्ज बोजाची नोंद नसली तरी कर्ज बोजाचा अर्ज तलाठी कार्यालयात सुपूर्द केलेची पोहोच सादर केल्यास कर्जाची रक्कम वितरीत करावी अशा अर्थाचे परभणी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे अन्य जिल्ह्यात देखील कार्यवाही करावी . अश्या सर्व पर्यायांचा वापर करून खातेदाराना वेळेत ७/१२ व ८अ उपलब्ध करून देनेची कार्यवाही करावी प्रत्येक तहसीलदार/ DBA यांनी OPG मधून ७/१२ च्या PDF व ८ अ च्या प्रती तालुका स्थारावरच DOWNLOAD करून तलाठी यांना वितरीत कराव्यात तसेच तालुका स्थरावरील अभिलेख कक्ष्यातून ७/१२ व ८ अ जनतेला उपलब्ध करून द्यावेत या साठी पुढील काही सुट्टीचे दिवस देखील काम चालू राहील ह्याचे नियोजन करावे ही विनंती आपला रामदास जगताप दि.१३.७.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send