रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार प्रणालीची अंमलबजावणी -- नविन सुधारणा UAT करणेबाबत

नमस्कार मित्रांनो , आज पासून uat दिलेल्या नवीन सुविधा क्र. कक्ष ४ / रा.भू.अ.आ.का./रा.स./५२ /२०१८ मा. जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय दिनांक २७ /०६ /२०१८ . प्रति उपजिल्हाधिकारी तथा डि डि ई रायगड, वर्धा, पालघर, बीड, अमरावती, अकोला व जालना. विषय - ई-फेरफार प्रणालीची अंमलबजावणी नविन सुधारणा UAT करणेबाबत. महोदय, ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपले मागणीप्रमाणे खालीलप्रमाणे प्रणालीत सुधारणा करुन आपल्या जिल्हयाच्या ( मुळ URL नंतर eferfar2beta_test) URL मध्ये उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांचा योग्य वापर करण्यासाठी सोबत user manuals देखील पाठविले आहेत. त्याप्रमाणे या सुविधा हेल्प डेस्कच्या मदतीने वापरुन पहाव्यात व UAT Report दिनांक 28/06/2018 रोजी सांयकाळी 5.00 पुर्वी पाठवावा. या मध्ये काही सुधारणा /बदल आवश्यक वाटत असल्यास तसे स्पष्ट रित्या नमुद करावे. UAT साठी दिलेल्या सुविधा. १. Removal of Role of MCI :- तहसिल कार्यालयातील फेरफार कक्ष बंद करुन त्यांचे कडील सर्व फेरफार आता तलाठी लॉगीनला उपलब्ध होतील तसेच दररोज दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती देखील थेट संबंधीत तलाठी यांचे लॉगीनला उपलब्ध होईल. त्यावर पुढील प्रक्रिया करुन पहावी. २. FIFO Principal ( First come first out Principle ) :- प्रथम नोंदणी झालेल्या दस्त क्रमांकाचा फेरफार प्रथम तयार केल्याशिवाय (अनुक्रमे) अन्य दस्तांचे फेरफार तयार करुन पुढील कार्यवाही करता येणार नाही. ३. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155च्या आदेशाने फेरफार तहसिलदार / मंडळ अधिकारी यांचेकडुन शेरा दुरुस्त करणे. :- काही तांत्रिक कारणांमुळे अथवा अपुर्ण प्रशिक्षणामुळे जुन्या मंजुर फेरफारापैकी काही फेरफारांचा तपशिल अपुर्ण/अर्धवट अथवा चुकीचा तयार झाला असल्यास अथवा मंडळ अधिकारी शेरा देखील चुकीचा साठवला गेला असुनही या फेरफारामध्ये समाविष्ठ स.नं. वर फेरफाराचा योग्य अंमल झाला असल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155च्या आदेशाने फेरफार तपशील व मंडळ अधिकारी शेरा दुरुस्त करता येईल यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार यांनी काम करणे आवश्यक आहे. ४. दुय्यम निबंधक कार्यालयातुन काही चुकीची डाटा एंट्री झाल्याने अथवा चुकीचे SKN, TKN तयार केले असतील, तर अशा प्रकरणी फेरफाराचा योग्य अंमल होऊ शकणार नाही अशा सर्व प्रकरणी Compulsory SKN, TKN दुरुस्ती तलाठी स्तरावर करण्याची सुविधा देणेत आली आहे. त्यानंतरच या फेरफाराचा योग्य अंमल 7/12 वर होऊ शकतो. तलाठी स्तरावर या सुविधेचा वापर करुन पाहणे. ५. Rearraging Khata No.: - ज्या गावात Jumping खाते क्रमांक पडलेले आहेत त्या गावात फेरफार प्रलंबित असलेली खाती वगळता इतर सर्व खात्यांचे क्रमांक अनुक्रमाकांने लावण्याची सुविधा देण्यात आली आहे. या पाचही सुविधांचे User Manual ही सोबत पाठवित आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करुन आपला सविस्तर UAT Report दिनांक 28/06/2018 रोजी सांयकाळी 5.00 पुर्वी इकडे पाठवावा ही विनंती. आपण काळजीपुर्वक UAT केली तरच यामध्ये काही त्रुटी असल्यास राज्यभरात या सुविधा देण्यापुर्वी सुधारणा करता येऊ शकेल. सबब काम काळजीपुर्वक करण्याच्या सुचना द्याव्यात व अहवाल पाठवावा. आपला विश्वासू ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे. प्रत - हेल्प डेस्क, कोकण, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभाग. विशिष्ट कर्मचारी / अधिकाऱ्यांना मार्गदर्शक करुन UAT करुन घ्यावी व UAT अहवाल प्राप्त करुन घ्यावा.

Comments

Archive

Contact Form

Send