फेरफार कक्ष प्रभारी ची (MCI) जबाबदारी काढून टाकणे वापरकर्ता चाचणी अहवाल -REMOVAL OF ROLE OF MCI -UAT REPORT दि.२२.६.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती ( सूची २) तहसील कार्यालयातील फेरफार कक्षाकडे (MCI) न पाठवता थेट तलाठी लोगिन ला पाठविण्यासाठी ई फेरफार प्रणाली मध्ये बदल करून
( REMOVAL OF ROLE OF MCI) सदरची प्रणाली वर्धा , जालना , बुलढाणा , बीड , रायगड , सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांना (Wardha, Sindhudurg, Jalna, Buldhana, Beed, Raigad and Palghar)
आज पासून उपलब्ध करून दिली आहे तसेच SRO आलेल्या चुकीच्या माहिती मध्ये दुरुस्ती करण्याची सोय देखील दिनेत आली आहे त्याचे युजर म्यानुअल त्या जिल्ह्यांना पाठवले आहे .
तपासून UAT REPORT संबंधित DDE यांनी सोमवारी पाठवावा त्यानंतर ही सुविधा सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देता येईल.
MCI Cell ची भुमिका कमी करण्याबाबत :-
Mutation Cell ची भुमिका कमी झाल्यानंतर तलाठी लोगिनमध्ये झालेले बदल खालील प्रमाणे आहेत :-
आता MCI Cell ऐजवी तलाठी लोगिनमध्ये नोटीस काढण्याची सुविधा UAT साठी eferfar2beta मध्ये वर्धा, सिंधुदुर्ग, जालना, बुलढाणा, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना दिलेली आहे
या सुविधेमुळे SRO कडुन आलेला दस्तामध्ये तलाठी यांना योग्य ती SKN-TKN दुरुस्ती/ RE ENTRY खालील प्रमाणे करता येईल.
१. SRO कडुन येणारा सामाईक खात्यातील नोंदणीकृत खरेदी दास्ता मध्ये हक्क देणारा seller khata number (SKN) नमुद केले नसल्यास
सुविधा - SKN-TKN दुरुस्ती ऑप्शन दिले आहे
२. SRO कडुन येणारा नोंदणीकृत दास्ता मध्ये सामाईक खात्यातील खरेदी हक्क देणारा seller khata number (SKN) नमुद केले आहे परंतु इतरसह हिस्सेदार हक्क देणारे यांना seller khata number (SKN) नमुद केले नसल्यास
सुविधा - SKN-TKN दुरुस्ती ऑप्शन दिले आहे.
३. नोंदणीकृत फेरफारामध्ये खाता मास्टरमधिल नावापेक्षा हक्क घेणा-यांची नावे कमी असल्यास
सुविधा – Re-Entry करावी.
४. नोंदणीकृत फेरफारामध्ये सामाईक खात्यापैकी एका खाताधारकानेच आपल्या नावासमोरील सर्व क्षेत्र विक्री केले असल्यास
सुविधा – Re-Entry करावी.
५. SRO कडुन येणारा नोंदणीकृत फेरफारामध्ये सामाईक खातेदारांपैकी एकाच खातेदाराने जमीन विक्री केली आहे परंतू उर्वरीत खातेदारांना देखील खरेदी देणार म्हणून दाखवले असल्याने PREVIEW योग्य दिसत नाही
सुविधा - SKN-TKN दुरुस्ती ऑप्शन दिले आहे.
६. SRO कडुन येणारा नोंदणीकृत फेरफारामध्ये खरेदी घेणारेचे TKN नमुद क्ले नसल्यास
सुविधा - SKN-TKN दुरुस्ती ऑप्शन दिले आहे.
टिप :- यासर्व सुविधामधुन हक्कसोड, गहाणखत हे फेरफाराचे प्रकार वगळण्यात आलेले आहेत
कृपया काळजीपूर्वक वापरून ( वापरकर्ता चाचणी अहवाल UAT REPORT) द्यावा
आपला
रामदास जगताप
दिनांक २२.६.२०१८
Comments