ई फेरफार प्रकल्पासाठी CLOUD SEVICES घेण्या बाबत .
नमस्कार मित्रांनो ,
अथक प्रयत्नानंतर २/३ दिवसापासून राज्यातील ७/१२ संगणकीकरणाचे बंद असलेले बहुसंख्य सर्वर काम करू लागले आहेत . असे असूनही अद्याप जळगाव , सांगली , सोलापूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये ई फेरफार काम सुरळीत होऊ शकलेले नाही . त्यासाठी SDC /DIT व NIC स्थरावर युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे . सर्वर मधील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , महसूल अधिकारी व खातेदाराना त्रास सहन करावा लागला हे शासनासह सर्व वरिष्ठ अधिकारी यांना ज्ञात आहे .शासनाने देखील या बाबत गंभीर दाखल घेऊन दि ४/६/२०१८ रोजी मा. महसूल मंत्री महोदयांच्या व दि. ५/६/२०१८ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली व SDC MADHEEEL सर्वर बाबत च्या अडचणी व सर्व शासकीय प्रकल्पांसाठी शासनाची CLOUD POLICY बाबत चर्चा झाली , यावेळी मा. मुख्यमंत्री महोदयांनी सातबारा साठी एक महिन्याच्या आत सर्व सर्वर GOVERNMENT COMMUNITY CLOUD वर स्थानांतरीत करण्याची निर्देश दिले आहेत . त्या दृष्टीने जमाबंदी आयुक्त , NIC , SDC , DIT व शासन स्थरावर कार्यवाही सुरु झाली असून या बाबतच्या ISARITA व E FERFAR प्रकल्पांसाठी च्या एकत्रित प्रस्थावाला मा. मुख्यसचिवांचे अध्यक्षतेखालील HPC ची मन्यता मिळेल व आपले कामकाज सुरळीत होईल असा मला विश्वास आहे .
आपला
रामदास जगताप
दिनांक ८/६/२०१८
Comments