खातेदारांना सातबारा उपलब्ध करून देणेसाठी
नमस्कार मित्रांनो ,
काही दिवसांपासून काही जिल्ह्याच्या सर्वर मधील तांत्रिक बिघाडामुळे शेतकरी खातेदारांना सातबारा ,
खाते उतारा देण्यात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निर्णय घेनेत आले आहेत .
१) महाभूलेख या संकेतस्थळा वरील ७/१२ वर असलेला VIEW ONLY हा WATER MARK काढनेत आला असून त्यावर असलेल्या सूचनेत बदल करून
" सूचना - या ७/१२ वर संबंधित तलाठी / नायब तहसीलदार यांची सही व शिक्का असल्यास शासकीय कामासाठी वैध " . अशी सूचना देनेत आले आहे .
२) तलाठी यांना ई फेरफार मधून ७/१२ देण्यास काही अडचणी येत असल्यास खातेदारांना महाभूलेख वरील ७/१२ व ८ अ प्रिंट काढून सही शिक्का करून प्रमाणित प्रत म्हणून देता येईल .
३) महाभूलेख वर घोषणापत्र ३ झाले नंतरचा व प्रख्यापन आदेश काढला असल्यास त्या नंतरचा ७/१२ दिसेल .
४) आपले सरकार संकेतस्थळावरील ७/१२ च्या WEB SERVICES सुरु करणेत आल्या असल्याने " आपले सरकार " वरून ही शेतकऱ्यांना ७/१२ उपलब्ध होईल .
५) राज्यातील सर्व जिल्ह्यात तलाठी लोगिन ने ७/१२ ८ अ व फेरफार अहवाल स्वरुपात उपलब्ध आहे .
त्यामुळे शेतकरी यांना पिक कर्ज घेण्यासाठी आठवा अन्य कामा साठी सुलभरीत्या ७/१२ व ८ अ उपलब्ध होऊ शकेल .
आपल्या जिल्ह्यात काही अडचणी असल्यास डी डी ई यांनी खात्री करून जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
आपला
रामदास जगताप
दिनांक - ९/६/२०१८
स. १०.०० वा
नमस्कार साहेब
ReplyDeleteमि तलाठयास नोंद करण्या करता पांन्त्र साहेब यांनी दिलेला आदेश पत्र दिला असुन तलाठी नोंद करत नाही त्याचे मह्नने असे कि मी तात्पुरता काही दिवसा साठी बदली वर असुन ऑनलाईन चा चार्ज माझ्या DSC ला ते गाव अद्यापही जोडले गेले नाही अशी चुकिची ऊत्तरे देत आहे या वर मला योग्य तो सल्ला द्यावा अशी आपणास विनंती आहे जेने करुन माझ्या नावाने अधिकारी अभिलेकात त्वरित नोंद करण्यात येईल व मला ऊतारा व फेरफार बनवून मिळेन.