मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित करतेवेळी करावयाची कार्यवाही.
नमस्कार मित्रांनो ,
विषय - मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित करतेवेळी करावयाची कार्यवाही.
१. मंडळ अधिकारी यांनी लॉगीन करुन गाव निवडल्यानंतर सर्व प्रथम ज्या फेरफाराला मंजुर/नामंजुर करावयाचा आहे त्या फेरफार क्रमांकाला निवडा करावे.
२. पुर्वालोकन पाहुन पुर्वालोकन शेरा व पडताळणी सुची भरावी.
३. त्यानंतर “फेरफार प्रमाणित करणे” या बटनावर क्लिक केल्यावर आपणास ७/१२ व फेरफार रजिस्टर पाहावयास मिळेल व “या सातबारा वर शेवटचा फेरफार (फेरफार क्र.----) हा प्रमाणित झाला असुन मंडळ अधिकारी यांनी “७/१२ वर योग्य रित्या अमल झाला आहे” याचे confirmation करणे बाकी आहे कृपया याची नोंद घ्यावी” असा मेसेज येईल त्यास ok करावे.
४. त्यानंतर मंडळ अधिकारी यांनी “फेरफार योग्यरित्या प्रमाणित झाला” व “फेरफार योग्यरीत्या प्रमाणित झाला नाही” अशा दोन शेरापैकी एक योग्य तो शेरा भरणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपण पुन्हा मुख्य डॅशबोर्ड वर जाऊन “फेरफार योग्यरित्या प्रमाणित झाला” या बटनावर क्लिक करावे त्यानंतर ७/१२ ओपन होईल.
५. पुन्हा मुख्य डॅशबोर्ड वर जाऊन १) सदर ७/१२ हा योग्यरीत्या प्रमाणित झाला असल्यास “OK”, २) सदर ७/१२ हा योग्यरीत्या प्रमाणित झाला नसल्यास “Cancel” अशी महत्वपुर्ण सुचना येईल. या मेसेजप्रमाणेच OK व Cancel करावे.
६. आपण Cancel चे बटन क्लिक केल्यास ७/१२ वर योग्य अमल झाला नाही असे असेल व त्यामुळे तलाठी यांना ७/१२ digital sign साठी उपलब्ध राहणार नाही. पुन्हा digital sign साठी उपलब्ध करण्यासाठी तहसिलदार यांचे आदेश घेऊन योग्य अमल घ्यावा लागेल.
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
दिनांक ९/६/२०१८
Comments