खाते क्रमांक अनुक्रमाने लावणे ही सुविधा दि. ११.६.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
खाते क्रमांक अनुक्रमाने लावणे ही सुविधा आज पासून टेस्टिंग साठी रायगड , वर्धा व लातूर जिल्ह्यात देनेत आली आहे त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी
१. प्रख्यापण आदेश काढलेल्या ज्या गावात JUMPING खाते क्रमांक खातेदारांना पडले आहेत त्या गावात ODC_TEST मध्ये ही सुविधा देनेत आली आहे
२. ODC_TEST मध्ये अश्या गावांची यादी DBA LOGIN ला अतिरिक्त अहवाल १४ मध्ये एकूण खाता क्रमांक व गावातील शेवटचा खाते क्रमांक या मध्ये तफावत असलेल्या गावांची यादी या अहवालात देनेत आली आहे .
३. तलाठी LOGIN ने ODC_TEST मध्ये गाव निवडल्या नंतर दुरुस्ती सुविधा (१ ते १० ) मधील सुविधा क्रमांक ७ मध्ये गावातील सर्व खाते क्रमांक योग्य क्रमाने लावणे या पर्यायातून दुरुस्ती करता येईल .
४. हा पर्याय क्लिक केले नंतर खात्यांचा क्रम बदला मध्ये फक्त JUMPING खाते क्रमांक मिळालेल्या खात्यांची यादी उपलब्ध होईल त्या पैकी २५ /५०/७५ /१०० खाते एका वेळी निवडून खातेक्रमांक अनुक्रमाने लावता येतील .
५. अश्या प्रकारे दुरुस्त खाते क्रमांकाची यादी अहवाल स्वरुपात उपलब्ध होईल
या साठी खालील अटी शर्ती महत्वाच्या आहेत
ज्या खात्यावर ई फेरफार / एडीट / री एडीट मधील फेरफार प्रलंबित नाही तेच खाते क्रमांक बदलता येतील.
खाते क्रमांक अनुक्रमाने लावत असताना कोणताही नवीन फेरफार घेऊ नये अथवा प्रमाणित करू नये .
रायगड , वर्धा व लातूर जिल्ह्यात टेस्टिंग पूर्ण झाले नंतर ही सुविधा सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली जाईल
आपला
रामदास जगताप
दि ११/६/२०१८
Comments