रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि. 4/06/2018 च्या दैनिक सकाळ मधील डिजीटल सातबाराचा बोजवारा या मथळयाच्या वृत्ताबाबत खुलासा

दि. 4/06/2018 च्या दैनिक सकाळ मधील डिजीटल सातबाराचा बोजवारा या मथळयाच्या वृत्ताबाबत खुलासा आज दि 04/06/2018 रोजीच्या दैनिक सकाळ मधील डिजीटल सातबाराचा बोजवारा चा या वृत्तामध्ये नमुद केलेली माहिती वस्तुस्थितीवर आधारीत नसुन याबाबत खालील खुलासा आपल्या दैनिकात छापण्यात यावा. फक्त मागील आठवड्यात काही दिवस ई-फेरफार प्रकल्पाच्या मुख्य सर्वर (Monitor Server) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील 29 जिल्हयामधील संगणकीकृत 7/12 बाबतचे कामकाज बाधीत झाले होते हे खरे आहे. तथापि त्यापैकी औरंगाबाद, नांदेड, नंदूरबार, परभणी व यवतमाळ हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्हयांचे सर्व्हर ७/१२ व खातेउतारा खातेदारांना उपलब्ध करून देण्यासाठी दि 01/06/2018 रोजी सुरु करण्यात आले आहेत. व या जिल्हयांचे देखील सर्वर दि ३ जून 2018 रोजी सुरु केले आहेत. तथापि सर्व सर्वर पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सुरु आहे. डिजीटल स्वाक्षरीत 7/12 वितरीत करणेची एक अतिरिक्त सुविधा दि १ मे 2018 पासुन उपलब्ध केलेली आहे. तथापि तलाठ्याने संगणकीकृत ७/१२ पारंपारिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच आहे. आज अखेर केवळ 40 लाख 7/12 डिजीटल स्वाक्षरीत झालेले आहेत व हे काम टप्याटप्याने प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शासनाने आजअखेर फक्त डिजीटल स्वाक्षरीत 7/12 स्विकारण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तलाठयाने संगणकीकृत 7/12 वर सही शिक्का करुन दिल्यास बोगस कागदपत्र दिल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा कोणताही तोंडी अथवा लेखी आदेश शासनाने दिलेला नाही. त्यामुळे या वृत्ताने विनाकारण खातेदारांमध्ये तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो. उलटपक्षी सद्यस्थिती सर्व संगणकीकृत 7/12, फेरफार व गाव नमुना 8 अ ( खातेउतारा) तलाठी यांच्या हस्तलिखीत स्वाक्षरीने वितरीत करण्याचे निर्देश शासनाचे आहेत व असे 7/12 सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राहय धरण्यात यावे.

Comments

Archive

Contact Form

Send