चार दिवस बंद असलेले सर्वर सुरु झाल्या बाबत सुचांना दि. १ जून , २०१८
नमस्कार मित्रांनो,
सोमवार दि. २८.५.२०१८ रोजी साय.६.०० वाजल्या पासून SDC वरील MONITOR SERVER ( ज्यावरून सर्व UC चे काम काज चालते )
मध्ये तांत्रिक बिघाड झाल्या मुळे व अन्य काही सेर्वरवर (.91) स्पेस कमी असल्याने राज्यातील २९ जिल्ह्यातील कामकाज ठप्प झाले होते .
या मुळे आपल्या सर्वच तलाठी , मंडळ अधिकारी , सर्व महसूल अधिकारी यांना जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागत होते याची पूर्ण जाणीव असून
सध्या पिक कर्ज घेण्यासाठी ७/१२ व ८ अ ची गरज विचारात घेऊन सदरचे काम तातडीने पूर्ववत करण्याचे काम SDC व माहिती तंत्रज्ञान संचालनालय स्थरावर सुरु आहे .
त्यात अद्याप पूर्णता यश आलेले नसलेतरी SDC ने एक पर्यायी MONITOR SERVER (.156) उपलब्ध करून दिला आहे . तो वापरून ई फेरफार ची जनतेला ७/१२,फेरफार व ८अ
उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची उपाय योजना म्हणून औरंगाबाद , लातूर , नांदेड , परभणी यवतमाळ व नंदुरबार हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्याचे सर्वर आज संध्या ८.०० वाजता सुरु करणेत आले आहेत.
मात्र दोन दिवस फक्त जनतेला ७/१२ , फेरफार व ८ अ उपलब्ध करून देण्यासाठी या सेवेचा वापर करावा .
UC मध्ये सध्या वापरत असलेला back up data ८ मार्च २०१८ चा असल्याने त्या नंतर dsc नोंदणी केलेले , नवीन नोंदणी केलेले , पदोन्नती झालेले वापर्कार्त्यांचे status
अपडेट झालेले नसेल मात्र ७/१२ व फेरफार चा data अद्यावत असेल या बाबत शंका नाही . त्यासाठी गाव निवडल्या नंतर अहवाल मधून खातेदाराना आवश्यक ते ७/१२ , ८ अ व फेरफार नकला देण्यात याव्यात , डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध नसल्याने तलाठ्याने हस्तलिखित स्वाक्षरी करून नकला द्याव्यात .
शक्यतो सोमवार पासून ई फेरफार मध्ये फेरफार घेणे व मंजूर करणे साठी ही सेवा वापरता येईल मात्र सर्वार्साठी पुरेशी स्पेस मिळेपर्यंत DSP चे काम काज सध्या बंदच ठेवाणेत येईल .
तांत्रिक अडचणी मुळे खातेदारांना व तलाठी मंडळ अधिकारी यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व .
आपला
रामदास जगताप
Comments