ई-फेरफार आज्ञावलीत रिएडिट मॉडयुलच्या गुणवत्तापुर्ण कामाबाबत मा. जमाबंदी आयुक्त यांचे अर्ध शासकीय पत्र
विषय :- ई-फेरफार आज्ञावलीत रिएडिट मॉडयुलच्या
गुणवत्तापुर्ण कामाबाबत.
संदर्भ :- या कार्यालयाचे दिनांक 3 डिसेंबर,2015, 5
मे 2017 व 10 जुलै 2017 ची परिपत्रके.
अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी चावडी वाचनाच्या विशेष
मोहिमेत प्राप्त आक्षेप व महसुल अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर
करण्यासाठी RE-EDIT MODULE उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामध्ये Data Cleaning & Data
Standardization अत्यंत महत्वाचे असून
ई-फेरफार आज्ञावलीच्या यशस्वी
अंमलबजावणीसाठी संगणकीकृत 7/12 चा डेटा योग्य असणे आवश्यक आहे.
चावडी वाचनाच्या विशेष
मोहिमेचा मुख्य उद्देश संगणकीकृत 7/12 व 8अ मधील चुका / त्रुटी दूर करणे हा होता
त्यासाठी अव्वल कारकुनापेक्षा वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची नियुक्ती प्रत्येक गांवाला
पालक महसूल अधिकारी म्हणून करणेत आली होती.
त्यांनी 1 ते 24 मुद्यांची तपासणी करुन अचूक 7/12 व 8अ बाबत खात्री करणे
अपेक्षीत आहे व सर्व काम पुर्ण झाल्यानंतर अचूक 7/12 ची तपासणी तलाठी (100%), मंडळ
अधिकारी (30%), नायब तहसिलदार (10%), तहसिलदार (5%),उपविभागीय अधिकारी (3%), व जिल्हाधिकारी
(1%) याप्रमाणे 7/12 तपासणी करुन ते हस्तलिखीत 7/12 प्रमाणे अचूक झाल्याची खात्री
करुन त्यानंतरच प्रपत्र -1 मधील प्रमापणपत्र देणे अपेक्षीत आहे. मात्र घोषणापत्र – 3 पुर्ण केलेल्या कांही
गावांची तपासणी केली असता संगणकीकृत 7/12
मध्ये त्रुटी /चुका तशाच ठेवून प्रमाणपत्र दिली जातात व संगणकीकृत 7/12 चे
प्रिंटआऊट तपासणी न करताच घोषणापत्र 1,2 व 3 देखील केली जात आहेत असे निदर्शनास
येत आहे. हे पुर्णत: चुकीचे आहे.
तथापि असे आपल्या जिल्हयात होत नाही याची आपण दक्षता घेतली असेल अशी माझी
अपेक्षा आहे.
राज्यातील जनतेला अचुक संगणकीकृत अधिकार अभिलेख उपलब्ध करुन देण्याची
शासनाची पर्यायाने आपली जबाबादारी असलेने व याबाबत सोलापूर जिल्हयातील W.P.NO.10204 of 2015 मधील उच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेता
अचूक 7/12 व 8अ देण्याची सर्व संबंधीतांची जबाबदारी आहे. याबाबत पुन्हा नमुद करण्यात येते की- ज्या गावात गुणवत्तापुर्वक व अचुक काम केले
जाणार नाही व काम अचुक झाल्याची खात्री न करता घाईघाईने चुकीचे प्रमाणपत्र सादर
करुन काम पुर्ण केले जाईल त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक कर्मचारी/अधिकारी
यांची जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची
कारवाई केली जाईल याची सर्व संबंधीतांना जाणीव करुन द्यावी असे मा. प्रधान सचिव
(महसुल) यांचे निर्देश आहेत. थोडक्यात चालु असलेले काम गुणवत्तापुर्वक व अचुक होईल
याची दक्षता घ्यावी. Zero Tolerance to Error हे तत्व शेवटपर्यंत पाळले जाईल याची
सुनिश्चिती करावी. यानंतर त्रुटी
दुरुस्तीसाठी कोणतीही इतर सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही याची देखील संबंधीतांना जाणीव करुन देण्यात यावी. अचुक व गुणवत्तापुर्ण काम वेळेत पुर्ण
करण्यासाठी शुभेच्छा.
आपला,
( एस. चोक्कलिंगम )
प्रति,
जिल्हाधिकारी (सर्व )
Comments