रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

घोषणापत्र ३ करणे बाबत सर्व तहसीलदार यांना सूचना ....

नमस्कार मित्रांनो ,

गेले दोन दिवस सुट्टीत अचूक ७/१२ व ८अ साठी काम करताना आपल्याकडून उपस्थित केलेल्या अडचणी व त्यावरील उपाय ....

सर्व तहसीलदार यांना सूचना

घोषणापत्र ३ करणे बाबत ---
घोषणापत्र २ डी बी ए यांनी केलेनंतर त्यांनीच घोषणापत्र ३ साठी माहिती भरून साठवावी व त्यानंतर तहसीलदार यांनी user creation utility मध्ये biometric login ने घोषणापत्र ३ करणे आवश्यक आहे , तथापि असे न करता हि फक्त डी बी ए यांनी माहिती साठवा झाले वर ते गाव घोषणापत्र ३ झाले म्हणून MIS मध्ये गृहीत धरले जात होते . त्या मध्ये सुधारणा करून फक्त तहसीलदार यांनी घोषणापत्र ३ प्रत्यक्ष biometric login ने घोषणापत्र ३ केलेली गावेच MIS मध्ये घोषणापत्र ३ झालेली गाव म्हणून उद्या पासून दाखवली जाणार आहेत त्यामुळे कदाचित आपल्या घोषणापत्र ३ झालेल्या गावांची संख्या  MIS  मध्ये उद्या कमी दिसू शकते . त्यामुळे आजच अश्या गावांचे घोषणापत्र ३तहसीलदार यांनी करण्याची दक्षता घ्यावी. तसेच काही गावांचे घोषणापत्र १ व २ झाले नसताना घोषणापत्र ३ झाले म्हणून दाखवत असल्यास ते हि तलाठ्याने घोषणापत्र १ व डी बी ए यांनी घोषणापत्र २ करून घेण्याची दक्षता घ्यावी .

महत्वाचे :-- MIS पाहताना तालुक्यातील प्रत्येक गावाचा status report पाहावा

रामदास जगताप
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send