अमरावती विभागातील सर्व महसूल अधिकारी यांचेसाठी ई-फेरफार प्रणालीची प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक ३.२.२०२१
नमस्कार मित्रानो
विषय - अमरावती विभागातील सर्व महसूल अधिकारी यांचेसाठी ई-फेरफार प्रणालीची प्रशिक्षण
कार्यशाळा दिनांक ३.२.२०२१
मा विभागीय आयुक्त अमरावती यांचे विनंतीवरून काल दिनांक ३.२.२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी , उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. , उप वभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि काही नायब तहसीलदार आणि मास्टर ट्रेनर्स तलाठी व मंडळ अधिकारी यांची सातबारा संगणकीकरण ची आढावा बैठक आणि ई-फेरफार प्रणाली बाबत प्रशिक्षण कार्यशाळा आणि शंकासमाधान कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या वर्षभर कोरना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळा यांचा शुभारंभ झाला .
या नंतर शिल्लक काम अधिक गतीने व गुणवत्ता पूर्वक पूर्ण करण्यासाठी ह्याचा निश्चित फायदा होईल असे मला वाटते
आपला
रामदास जगताप
दि. ४.२.२०२१
Comments