रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज पासून ई फेरफार प्रणाली मध्ये खालील सुविधा उपलब्ध करून दिल्यां आहेत.

नमस्कार मित्रांनो ,


आज पासून ई फेरफार प्रणाली मध्ये खालील सुविधा उपलब्ध करून दिल्यां आहेत.

१. तहसीलदार यांचे आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे 

ज्या ठिकाणी काही ७/१२ अद्याप ऑनलाईन करणेत आले नसतील ते सर्व ७/१२ तहसीलदार यांचा आदेश घेवून
 नवीन तयार करून ऑनलाईन करता येतील तसेच काही ठिकाणी मळी जमीन किंवा खाडी रेक्लेमेशन करून जमीन तयार केली असेल व तसे नवीन अधिकार अभिलेख अस्तित्वात आणण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले असतील तर त्यासाठी देखील तहसिल्दाअर यांनी असे नवीन ७/१२ करण्यासाठी लेखी आदेश दिल्यास या सुविधेतून नवीन ७/१२ ( जीउना ७.१२ बंद न करता ) तयार करता येईल . 
त्यासाठी पुन्हा तहसीलदार यांची कलम १५५ प्रमाणे मान्यता ( अंगठा देवून ) घ्यावी लागणार नाही . 

२. भोगवटादार वर्ग १  मध्ये काही उप प्रकार चुकून निवडला असल्यास तसा शेरा ७/१२ चे इतर हक्कात येतो  मात्र तो उप प्रकार चुकीचा असल्यास तो नष्ट / निरंक करण्याची सोय आत्ता देनेत आली आहे . अशी दुरुस्ती केल्यास ७/१२ चे इतर हक्कातील शेरा आपोआप कमी होईल .

३. तक्रार नोंदी चा शेरा निर्गत करून फेरफार निर्गत होताना येणारी अडचण दूर करणेत आली आहे 




आपला 
रामदास जगताप 
दि ९.११.२०१९ 

 

Comments

Archive

Contact Form

Send