रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सर्व्हे - खाते माहिती अहवाल निरंक करणे बाबत....


मार्गदर्शक सूचना क्र.१०१                                                                                 रा.भू.अ.आ.का.4/रा../१५  /2019
                                                                                                                                      जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,

                                                                                                                                     (हाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे कार्यालयपुणे

                                                                                                                                     दिनांक: 0/0/2019.
प्रति,              
         मा.  उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)
    
                           विषय :- सर्व्हे - खाते माहिती  अहवाल निरंक करणे बाबत....

महोदय                                                            
तलाठी लोगिन ई-फेरफाराच्या मेनुमध्ये सर्व्हे - खाते माहिती  या अहवालात खालील प्रमाणे यादी दिलेली आहे त्याची दुरुस्ती करणे अथवा योग्य असल्यास तहसिलदार यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय दिलेल्या यादीतील 7/12 वर फेरफार घेता येणार नाही शिवाय उपविभागीय अधिकारी यांना सदर गावाचे घोषणापत्र ४  करता येणार नाही. तरी अशा सर्व सर्व्हेची योग्य ती दुरुस्ती अथवा तहसिलदार यांची मान्यता घेणे आवश्यक राहिल.
                        कोणत्याही सर्व्हेवर खालील पैकी त्रुटी असल्यास त्याची यादी सर्व्हे - खाते माहिती  उपलब्ध असेल:-
                        १. २० हे पेक्षा जास्त क्षेत्राचे शेतीचे ७/१२ व ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२      
२.  क्षेत्र     एकक चूक असलेले ७/१२ (आर चौ.मी. मध्ये असलेले शेती चे ७/१२ व हे. आर. क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२)
३. एक आर पेक्षा जास्त क्षेत्राची तफावत असलेले अहवाल १ मधील ७/१२
         वरीलपैकी कोणतीही त्रुटी असल्यास फेरफार व दस्त नोंदणी साठी अपात्र ठरविणेत आले आहेत (BLOCK करणेत आले आहेत ) व त्यासाठी फेरफार घेताना खाली दिलेला विशिष्ट मेसेज देण्यात आला आहे :-

१.  २० हे पेक्षा मोठे ७/१२ असल्यास  
तलाठी लॉगिनला येणारा मेसेज :-
“सूचना : जे ७/१२ कृषिक  आहेत त्या ७/१२ चे क्षेत्र जर 20 हेक्टर पेक्षा जास्त असल्यास अथवा  जे ७/१२ अकृषिक  आहेत त्या ७/१२ चे क्षेत्र
जर 99 आर पेक्षा जास्त असल्यास त्यांचे क्षेत्र व एकक पुन्हा खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी २ पर्याय आपणास उपलब्ध आहेत.   
                        पर्याय - १ : जर क्षेत्र दुरुस्ती चे काम अपूर्ण असल्यास - कलम १५५ च्या आदेशाने  क्षेत्र दुरुस्ती चा फेरफार घ्यावा.
                        पर्याय - २ : जर या ७/१२ चे क्षेत्र व एकक बरोबर असल्याची आपणास खात्री असल्यास या ७/१२ साठी एकदा तहसीलदार/नायब तहसीलदार
                        यांची एकवेळ मान्यता घ्यावयाची आहे.  सदर मान्यता घेण्यासाठी तहसीलदार/नायब तहसीलदार यांना User Creation Module       मध्ये  गावातील वरील नमूद क्षेत्र गटानुसार जास्त क्षेत्र असलेले ७/१२ मान्यतेसाठी उपलब्ध केले आहेतत्यानुसार कारवाई करावी. म्हणजेच                        स्थिती नुसार पर्याय-१ किवा पर्याय - २ चा वापर करूनच फेरफार घेता येईल याची नोंद घ्यावी.
दुय्यम निबंधक यांचेकडे येणारा मेसेज -
                        “सदर  ७/१२ हा २० हेक्टर पेक्षा  मोठा आहे,  परंतु या  ७/१२ चे क्षेत्र योग्य असल्याचा शेरा तलाठी / तहसीलदार यांचे स्तरावर प्रलंबित आहे.
                        तरी तलाठी यांचे  मार्फत सदर  ७/१२ चे  क्षेत्र यॊग्य असल्याची कार्यवाहीपूर्ण करून घ्यावी . त्यानंतर हा ७/१२ दस्त नोंदणी साठी उपलब्ध
                        होईल कृपया याची नोंद घ्यावी.”

2. क्षेत्र व एकक तफावत असलेले ७/१२ :-
तलाठी लॉगिनला येणारा मेसेज-
                        सदर ७/१२ हा कृषिक असून त्यावरील एकक हे अकृषिक ७/१२ चे म्हणजेच आर.चौ.मी.आहे किंवा सदर
७/१२ हा अकृषिक असून त्यावरील एकक हे कृषिक ७/१२ चे म्हणजेच हे.आर.चौ.मी.आहेतरी या ७/१२ चे एकक योग्य ते करून घ्यावे
त्यानंतरच या ७/१२ वर फेरफार घेता येईल.  यासाठी २ पर्याय आपणास उपलब्ध आहेत.   पर्याय - १ : १५५ क्षेत्र दुरुस्ती आदेश.
पर्याय - 2 : १५५  एकक बदल आदेश.
SRO कडे येणारा मेसेज
अकृषिक:- सदर /१२ हा अकृषिक असून त्यावरील एकक हे कृषिक /१२ चे म्हणजेच हे.आर.चौ.मी.आहेतरी या /१२ चे एकक संबंधित
तलाठी यांचे मार्फत आंर.चौ.मी करून घ्यावे त्यानंतरच या /१२ वर दस्त नोंद घेता येईल याची नोंद घ्यावी.
कृषिक:- दर /१२ हा कृषिक असून त्यावरील एकक हे अकृषिक /१२ चे म्हणजेच आर.चौ.मी.आहेतरी या /१२ चे एकक संबंधित तलाठी
यांचे मार्फत  हे.आर.चौ.मी करून घ्यावे त्यानंतरच या /१२ वर दस्त नोंद घेता येईल याची नोंद घ्यावी.
अकृषिक:- सदर  /१२ हा २० हेक्टर पेक्ष्या मोठा आहे,  परंतु या  /१२ चे क्षेत्र योग्य असल्याचा शेरा तलाठी /तहसीलदार यांचे स्तरावर 
प्रलंबित आहे. तरी तलाठीयांचे मार्फत सदर /१२ चे क्षेत्र यॊग्य असल्याची कार्यवाहीपूर्ण करून घ्यावी. त्यानंतर हा /१२ दस्त नोंदणीसाठी  
उपलब्ध  होईल  कृपया याची नोंद घ्यावी.
                        कृषिक:-सदर  /१२ हा ९९ आर  पेक्ष्या मोठा आहेपरंतु या  /१२ चे क्षेत्र योग्य असल्याचा शेरा तलाठी/तहसीलदार यांचे स्तरावर प्रलंबित  
                        आहेतरी तलाठी यांचे  मार्फत सदर /१२ चे  क्षेत्र यॊग्य असल्याची कार्यवाहीपूर्ण करून घ्यावीत्यानंतर हा /१२ दस्त नोंदणी साठी उपलब्ध
                        होईल कृपया  याची नोंद घ्यावी.

3. अहवाल १ मधील १ आर पेक्षा जास्त क्षेत्राचे तफावत असलेले ७/१२ :-
तलाठी लॉगिनला येणारा मेसेज :
                        या ७/१२ वरील गाव नमुना ७ चे क्षेत्र व खातेदार यांचे एकूण क्षेत्र यामध्ये खूपच तफावत आहे- कदाचीत नमुना ७ चे क्षेत्र हे योग्य भरले आहे
                        (क्षेत्र व एकक) परंतु खातेदाराचे क्षेत्र हे चौरस मीटर मध्ये नमूद आहे किंवा 7/12 चे एक़ुण क्षेत्र व खातेदारांच्या नावासमोरील क्षेत्रात तफावत               आहे. यामुळे सदर ७/१२ इ-फेरफार मध्ये फेरफारा साठी घेण्या अगोदर अहवाल-१ दुरुस्तीचा १५५ कलम खाली फेरफार घेऊन योग्य त्या   क्षेत्राच्या दुरुस्त्या पूर्ण कराव्यात.
SRO कडे येणारा मेसेज
                        अहवाल १ मधील प्रतिबंधित ७/१२ : सदर /१२ हा अहवाल  मध्ये क्षेत्राची तफावत .०१ पेक्ष्या जास्त असल्यामुळे तलाठी यांचे मार्फत सदर                           /१२  चे  क्षेत्रा बाबत  यॊग्य  कार्यवाही पूर्ण करून घ्यावीत्यानंतर हा /१२ दस्त नोंदणी  साठी उपलब्धहोईल कृपया याची नोंद घ्यावी.

वरील प्रमाणे दर्शविलेल्या तीनही त्रुटी दूर करणेसाठी च्या सुविधा कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती सुविधा मध्ये देणेत आलेल्या आहेत .
1. जर १ आर पेक्षा जास्त क्षेत्राची तफावत असलेले अहवाल १ मधील ७/१२ :-अशा 7/12 ची दुरुस्ती 155 च्या आदेशाने अहवाल-1 ची  
दुरुस्ती करुन घ्यावी व 7/12 चे एक़ुण क्षेत्र व खातेदारांच्या नावासमोरील क्षेत्रात तफावत योग्य त्या आदेशाने दुर करावी.
                        2. क्षेत्र     एकक चूक असलेले ७/१२ (आर चौ.मी. मध्ये असलेले शेती चे ७/१२ व हे. आर. क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२) :-
(अ) आर चौ.मी. मध्ये असलेले  शेती चे ७/१२ चे एकक 155 च्या आदेशाने एकक बदलणे  मधुन आर चौ.मी चे हे.आर मध्ये रुपांतरीत करावे. 
(ब) हे. आर. क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२ असल्यास तलाठी मेनुमधुन अनोंदणीकृतमधुन बिनशेती असलेल्या 7/12 एकक बदलणे करावे
त्यामुळे संपुर्ण गावातील बिनशेती असलेल्या 7/12 एकक आर.चौ.मी. होईल.
3. २० हे पेक्षा जास्त क्षेत्राचे शेतीचे ७/१२ व ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले बिनशेतीचे ७/१२ :-असे ७/१२ खरोखरच योग्य असतील ते 7/12
तलाठी यांनी खात्री करून 155 च्या आदेशामधुन तहसीलदार / डी बी ए यांना ऑनलाईन विनंती पाठवील त्या प्रमाणे तहसीलदार / डी बी ए
यांनी एक वेळ असे ७/१२ योग्य असल्याचे मान्य केले पाहिजे. या नंतर असे ७/१२ ई फेरफार/दस्त नोंदणीला पात्र समजले जातील.
(नोट : जरी आपण 20 हेक्टर पेक्षा मोठ्या जमिनीसाठी चेक ठेवला आहे तरी आपण तलाठी म्हणून आपल्या गावातील सर्व जमिनींचे क्षेत्र व एकक तपासून योग्य त्या दुरुस्त्या करावयाच्य आहेत. आता आपला ७/१२ ची माहिती ही वेगवेगळ्या योजनासाठी देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक ७/१२ हा सर्व  बाबीने  अचूक असावा याची आपणास काळजी घ्यावयाची आहे.)
                सदरच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.                                                             
                                       
आपला विश्वासू,


रामदास जगताप)
   राज्य समन्वयक-फेरफार प्रकल्प
    जमाबंदी आयुक्त कार्यालय (.राज्यपुणे.
               प्रत .-
               मा . उप आयुक्त ( महसूल ) विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
              उप विभागीय अधिकारी (सर्व)
               तहसीलदार (सर्व)

Comments

Archive

Contact Form

Send