“मंडळनिहाय वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका स्तरीय अहवाल” ई मेल आय डी नोंदविला आहे का नाही? हे पाहण्यासाठी
क्र.रा.भू.अ.आ.का./रा.स/१२/२०१९
जमाबंदी
आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे
दिनांक २7/02 /201९
प्रति ,
उपजिल्हाधिकारी
तथा डि. डि. ई. (
सर्व )
महोदय,
ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी
अंमलबजावणीसाठी शासन धोरणाप्रमाणे
प्रणालीचे पुर्ण कामकाज माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उच्चाधिकार समितीने निश्चित करुन दिलेल्या
ESDS Software Solution Pvt. Ltd. या
GCC Cloud कंपनीचे डाटा
सेंटर मध्ये
लवकरच स्थानांतरीत करणेत येणार आहे. त्यासाठी
क्लाऊडवर स्थानांतरीत
करण्यापूर्वी आपल्या जिल्हयातील तलाठी, मंडळ
अधिकारी यांचेसह सर्व वापरकर्ते यांचे अचूक ई-मेलआयडी
व अचूक मोबाईल नंबर युझर क्रियेशन मधुन प्रणालीमध्ये नोंदविणे बाबत
कळविण्यात आलेले आहे.
परंतु
अद्यापावेतो अनेक वापरकर्त्यांच्या ई-मेल आय डी ची नोंद झाल्याचे दिसून येत नाही,
तरी प्रत्येक डीबीए यांचे UC लॉगिन
मधून “मंडळनिहाय
वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका
स्तरीय अहवाल” या
अहवाल मधून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ई-मेल आय डी ची नोंद
केल्याची पडताळणी करून ज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या ई-मेल
आय डी ची नोंद नाही,
त्यांची नोंद करून “ मंडळनिहाय
वापरकर्ता नोंदणी (User
Creation) तालुका स्तरीय अहवाल ” अहवाल
या कार्यालयास तात्काळ सादर करावा, ही विनंती.
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त व संचालक
भूमी अभिलेख (म. रा.) कार्यालय पुणे .
Comments