ई फेरफार प्रणाली मध्ये DDE यांनी SDO यांची नोंदणी करणे व तलाठी मंडळ अधिकारी यांचे ई मेल आय डी व मोबाईल नं. नोंदविणे बाबत. मार्गदर्शक सूचना क्र.९५
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
( महाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे कार्यालय, पुणे
दिनांक:- 31/01/2019.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डीडीई (सर्व.)
विषय :- ई फेरफार प्रणाली मध्ये
DDE यांनी SDO यांची नोंदणी करणे व
तलाठी मंडळ
अधिकारी
यांचे ई मेल आय डी व मोबाईल नं. नोंदविणे
बाबत.
शासन निर्देशाप्रमाणे ई
फेरफार प्रणालीमध्ये उपविभागीय अधिकारी यांना प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी
यांची नोंदणी व सर्व वापरकर्ते यांचे ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात
येत आहेत.
1 १.
फेरफार प्रणाली मध्ये DDE यांनी SDO यांची नोंदणी करणे बाबत.
ई फेरफार प्रणाली मध्ये SDO
यांना प्रमुख जबाबदारी
देण्याच्या उद्देशाने दिलेल्या सुचना प्रमाणे USER CREATION MODULE मध्ये सर्व DDE यांना आपल्या जिल्ह्यातील सर्व
उप विभागीय अधिकारी (SDO) यांची नोंदणी करणे व त्यांचे बोटांचे ठसे नोंदविण्याची सोय उपलब्ध करून
दिली आहे त्यामुळे प्रत्येक DDE यांन ज्या प्रमाणे तहसीलदार व नायब तहसीलदार यांची नोंदणी करता येते त्या
प्रमाणे त्यांना आत्ता SDO यांची नोंदणी करता येईल . तरी सर्व DDE यांना सूचित करणेत येते कि आपण आपले जिल्ह्यातील सर्व SDO
यांची नोंदणी दिनांक 5 फेब्रुवारी, २०१९ पूर्वी पूर्ण
करून तसा अहवाल आपण शासनाला सादर करावा. नोंदणी साठी SDO यांचा सेवार्थ आय डी पगार पत्रकावरूनच भरावा तसेच नोंदणी केलेले PASSWORD
संबंधित SDO यांना कळवावेत . सर्व SDO
यांना हे USER
NAME व PASSWORD
वापरून MIS काढता येईल तसेच हेच ई मेल आय
डी व पासवर्ड वापरून घोषणापत्र ४ करता येईल ( अजून घोषणापत्र ४ ची ही सुविधा देनेत
आलेली नाही ) सर्व DDE यांनी आपला अहवाल दिनांक 5.२.२०१९ रोजी साय ५.०० वा पर्यंत पाठवावी ही
विनंती.
2.
वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका स्तरीय अहवाल-२ डीडीई यांना पाठविणेबाबत.
DBA लोगिन ने सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे स्वतःचे ई मेल आय
डी व मोबाईल नंबर भरल्यानंतर सर्व DBA यांनी त्यांचे लोगिन ने उपलब्ध होणारा वापरकर्ता नोंदणी (User Creation) तालुका स्तरीय अहवाल २ हा अहवाल काढून त्यावरून सर्व
वापरकर्ता यांचे यांचे भरलेले मोबाईल नं.
व ई मेल आय डी योग्य व अचूक असल्याची खात्री करावी तसेच सेवार्थ आईडी, नाव, मोबाईल
नं, पदनाम, ई-मेल आयडी, ठसा नोंद झाली आहे
का ?, जोडलेली
गावे योग्य आहेत का? ह्याची खात्री करावी तसेच सर्व
तलाठी साझे व महसूल मंडळे तयार केली असल्याची खात्री करावी . सर्व DBA यांनी वापरकर्ता नोंदणी(User
Creation)तालुका स्तरीय
अहवाल २ डीडीई यांना पाठवणे त्या नंतर सर्व डीडीई यांनी जिल्ह्याचा एकत्रित अहवाल
ईकडे पाठवावा ज्या ज्या वेळी कोणत्याही वापरकर्त्याचा ई मेल आय डी अथवा मोबाईल नं
बदलल्यास तो DBA यांनी USER CREATION मधून अद्यावत करावा. तरच या वापरकर्त्याला GCC Cloud वरील ई फेरफार
प्रणालीत वापरकर्ता म्हणुन कामकाज करता येईल.
सदरच्या
सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
आपला विश्वासू,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
Comments