रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

जिल्हास्थरीय मास्टर ट्रेनर्स ची जबाबदारी

नमस्कार मित्रांनो ,


        दि ११ ते १३ फेब्रु , २०१९ या कालावधीत नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील ५५  जिल्हास्थरीय मास्टर ट्रेनर्स चा तीन दिवसीय प्रशिक्षण वर्ग यशदा पुणे येथे संपन्न झाला . त्यावेळी ज्या जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स उपस्थित राहू शकले नव्हते त्या जिल्ह्याचे डी डी ई यांनी त्यांचे मास्टर ट्रेनर्स यांना दि १८ ते २० किंवा २१ ते २३ फेब्रु या कालावधीत उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत .

           डी डी ई यांना विनंती आहे कि ई फेरफार प्रणाली व त्या अनुषंगिक सर्व मोडुल चे सर्वंकष प्रशिक्षणाने  प्रशिक्षित  या जिल्हा स्थरीय मास्टर  ट्रेनर्स ने  प्रत्येक तालुक्यातील दोन तलाठी एक मंडळ अधिकारी व डी बी ए यांना सक्षमरीत्या तत्काळ  प्रशिक्षित करावे . त्या नंतर असे तालुका स्थरीय प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स यांनी अन्य तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षित करून त्यांची क्षमतावृद्धी करावी .  या प्रशिक्षण वर्गात ई फेरफार प्रणालीतील सर्व फेरफार प्रकार कसे वापरायचे , फेज १ व फेज २ म्हणजे काय ,  GCC CLOUD स्थलांतरासाठी पूर्वतयारी , ई पीक पाहणी , ई हक्क , कलम १५५ अंतर्गत दुरुस्त्या , खाता दुरुस्ती , चूक दुरुस्ती , वाडी विभाजन , MIS चा वापर करून प्रलंबित कामकाजावर नियंत्रण व अहवालांचा वापर करून कामाच्या गुणवत्ते बाबत खात्री करणे अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर प्रशिक्षण , ASSIGNMENT व ऑनलाईन परीक्षा क्षमतावृद्धी करणारे प्रशिक्षण दिले जात आहे ना ह्याची खाती करावी . प्रत्येक जिल्ह्यात  व तालुक्यात सदरचे प्रशिक्षण योग्य रित्या होते किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी डी डी ई , प्रांताधिकारी व तहसीलदार यांची राहील .



आपला
रामदास जगताप
दि १४.१.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send